मांजरीला वाचवण्यासाठी आज्जीने नातवाला 5व्या मजल्यावर लटकवलं, पाहा Shocking Video

मांजरीला वाचवण्यासाठी आज्जीने नातवाला 5व्या मजल्यावर लटकवलं, पाहा Shocking Video

मांजरीला वाचवण्यासाठी आज्जीने स्वत:च्याच नातवाचा जीव घातला धोक्यात, धक्कादायक VIDEO VIRAL

  • Share this:

बीजिंग, 10 जानेवारी : सोशल मीडियावर याआधी एक लहान मुलगी चार मजली इमारतीच्या खिडकीतून बाहेर आली आणि भिंतीवर चालू लागली हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृध्द महिला आपल्या सात वर्षांच्या नातवाला दोरीनं इमारतीच्या पाचव्या मंजल्यावर लटकवताना दिसत आहे. मुख्य म्हणजे हा सगळा खटाटोप या महिलेनं एका पाळीव मांजरीला वाचवण्यासाठी केला.

हा व्हिडीओ चीनमधला असून, इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या लोकांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. त्यानंतर चीनच्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म वीबोवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मांजर इमारतीच्या दोन फ्लोअरच्यामध्ये अडकली होती. महिलेनं मांजरीला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अखेर थेट तिनं आपल्या नातवाला खाली उतरवले. खाली उभ्या असलेल्या लोकांनी या महिलेला सावधान राहण्यासही सांगितले.

वाचा-महिलांचा कपडे बदलतानाचा VIDEO व्हायरल, पेट्रोल पंपावरील ड्रेसिंग रूमधला प्रकार

वाचा-भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीतून पडला चिमुकला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, मांजरीला वाचवण्यासाठी 10 मिनिटे सर्व प्रयत्न करत होते. त्यामुळं 10 मिनिटे मांजर आणि मुलगा हवेत लटकत होते. ही घटना सिचुआन प्रांताच्या पेंगटन काउंटी येथे झाली. या व्हिडीओनंतर सर्व लोक महिलेला ट्रोल करत आहे. मांजरीला वाचवण्यासाठी आपल्या नातवाला लटकवल्यामुळं लोक ट्रोल करत आहेत.

वाचा-चौथ्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर आली चिमुकली, श्वास रोखून पाहा VIDEO

रेड स्टार न्यूजच्या वृत्तानुसार मुलाने सांगितले की, "मी खूप घाबरलो होतो, व्हिडिओ पाहिल्यावर आजीसुद्धा घाबरली होती". तर, या महिलेने, “आता पुढे कधीच असे करणार नाही. पण त्या क्षणी तिला मांजरीची काळजी होती आणि तिने मोठ्या धैर्याने हा निर्णय घेतला होता”, असे सांगितले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओ शूट करणाऱ्यांवरही टीका केली जात आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: January 10, 2020, 3:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading