मराठी बातम्या /बातम्या /देश /

महिलांचा कपडे बदलतानाचा VIDEO व्हायरल, पेट्रोल पंपावरच्या ड्रेसिंग रूममधला प्रकार

महिलांचा कपडे बदलतानाचा VIDEO व्हायरल, पेट्रोल पंपावरच्या ड्रेसिंग रूममधला प्रकार

महिलांचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तीघांना अटक. कोइंबतूरमधील पेट्रोल पंपावरील धक्कादायक घटना. ड्रेसिंग रुममध्ये मोबाइल फोन ठेवून महिलांचा व्हिडीओ केला रेकॉर्ड.

    तामिळनाडू, 9 जानेवारी : तामिळनाडूच्या कोइंबतूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. महिलांचा कपडे बदलतानाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय. इथल्या एका पेट्रोल पंपावरच्या ड्रेसिंग रूममधली ही घटना आहे. महिला कपडे बदलतानाचा VIDEO सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. अटक केलेल्या तिघांमध्ये एका रिपोर्टरचाही समावेश आहे. पत्नीचाही केला व्हीडिओ मणिकांदन, सुभाष आणि रिपोर्टर मरुथाचलम अशी या तिघांची नावं आहेत. त्यांच्यापैकी एकाच्या पत्नीचाही त्यांनी व्हीडिओ बनवला होता. व्हायरल केलेल्या VIDEO मध्ये महिला कपडे बदलाताना दिसतायत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या तिघांपैकी दोन व्यक्ती या पेट्रोल पंपावरच काम करणाऱ्या आहेत. या दोघांपैकीच एकाने ड्रेसिंग रूममध्ये मोबाइल फोन ठेवून त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा VIDEO बनवला. एका महिलेच्या आलं लक्षात कपडे बदलताना ड्रेसिंग रूममध्ये एका महिलेला मोबाइल दिसला. मोबाइलमध्ये VIDEO रेकॉर्डिंग सुरू असल्याचं तिच्या लक्षात आलं. आपला व्हीडिओ रेकाॅर्ड झाल्याचं कळताच तिने याबद्दल आपल्या पतीला कळवलं. पोलिसांच्या माहितीनुसार सुभाष नावाच्या आरोपीने ड्रेसिंग रूममध्ये मोबाईल ठेवला होता. सोशल मीडियावर व्हायरल या प्रकरणातल्या मणिकांदन या आरोपीच्या पत्नीला हा मोबाइल दिसला होता. तिने याबाबत तिच्या पतीला माहिती दिली तेव्हा तिच्या पतीने तो VIDEO डिलीट करुन मोबाइल तोडून टाकला होता. मात्र तरीही महिलांचा तो व्हीडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आणखी दोन महिलांनीही याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांच्या माहितीनुसार सुभाष नावाच्या आरोपीने मोबाइलमधला महिलांचा तो VIDEO मिळवला आणि मणिकांदनला पाठवला. त्यानंतर मणिकांदनने तो सोशल मीडियावर व्हायरल केला.महिलांच्या तक्रारी आल्यानंतर  पोलिसांनी तात्काळ त्या तिघांना अटक केली.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या