चीन, 14 ऑक्टोबर: मुलाच्या करामतीमुळे एका आईच्या नाकीनऊ आल्याची घटना घडली आहे. चीन(China) मधल्या एका आईला (Naughty Child) मुलाच्या करामतीमुळे पोलिसांना बोलवावं लागलं आहे. या महिलेच्या मुलानं आपल्या आपल्या गळ्यात स्वतःच्या सायकलचा लॉक(Bicycle Lock) काढून गळ्यात फिक्स केला. एवढंच नाही तर गळ्यात लॉक अडकवल्यानंतर मुलगा लॉकचं (Child Forgets Lock Combination)कॉम्बिनेशन देखील विसरला. धक्कादायक म्हणजे यात त्याच्या आईचा श्वास कोंडला होता.
ही घटना चीनच्या जियांगसू प्रांतातील आहे. येथे राहणाऱ्या एका 4 वर्षांच्या मुलानं सायकलचे U- आकाराचे लॉक सायकलमधून काढलं आणि आईच्या गळ्यात घातलं. त्यावेळी आई साफसफाई करण्यामध्ये बिझी होती. मुलगा आपल्या गळ्याला कुलूप लावेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. आईलाही सुरुवातीला हा जोक वाटला. कारण तिला लॉकचा कोड माहित होता. पण गोंधळ कधी झाला, जेव्हा मुलानं लॉकचं कॉम्बिनेशन बदललं आहे तिला कळलं. त्यानंतर आईला फार घाम सुटला.
हेही वाचा- खासदार नवनीत राणांनी महिलांसोबत खेळला गरबा, क्षणार्धात Video व्हायरल
आईच्या जीवावर बेतली मुलाची मस्ती
मुलानं टॉयलेट (Tiolet Cleaning) साफ करताना आईच्या गळ्यात कुलूप घातलं आणि ते लॉक केलं. जेव्हा आईनं जुन्या कॉम्बिनेशननं ते उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा लॉक उघडलं नाही. त्यांना माहित नव्हतं की मुलानं लॉकचा कोड बदलला आहे. एवढंच नाही तर मुलगाही कॉम्बिनेशन विसरला होता. अशा परिस्थितीत महिलेनं तातडीने पोलिसांना मदतीसाठी बोलावलं. पोलीस आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत लॉकची वायर तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. मानेवर टॉवेल ठेवल्यानंतर त्यांनी हळू वायर तोडली आणि हे लॉक महिलेच्या गळ्यातून बाहेर काढलं.
हेही वाचा- गोळ्या झाडून पुजाऱ्याची हत्या, मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू; दोघांची प्रकृती गंभीर
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सायकलचे लॉक महिलेच्या गळ्याभोवती (Child Puts Bicycle Lock Around Mother’s Neck) अडकल्याचा आणि कापल्याचा व्हिडिओ (Video Viral) चीनच्या (China) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) झाला आहे. यावर प्रतिक्रिया देत यूजर्सनी म्हटलं आहे की, मुलांना त्यांच्या मर्यादा शिकवण्यासाठी पालकांना अधिक मेहनत करावी लागेल. आणखी एका यूजरनं म्हटलं की, हे स्पष्टपणे मुलांना शिस्तबद्ध न केल्याचा परिणाम आहे. हे पाहिल्यानंतर हसण्याची गरज नाही, पण त्यातून शिकण्याची गरज आहे, जेणेकरून अशा समस्या घरी येणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China