अमरावती, 14 ऑक्टोबर: अमरावती (Amravati district) जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सव (Navratri festival) सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधील दुर्गा देवी मंडपात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) भेट दिली.
नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील एका दुर्गा देवी मंडपाबाहेर सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबत गरबा दांडीया खेळल्या.
चक्क खासदार राणा गरबा खेळल्यामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
हेही वाचा- गोळ्या झाडून पुजाऱ्याची हत्या, मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू; दोघांची प्रकृती गंभीर
येथे मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नवनीत राणा या विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहतात आता गरब्या नृत्यामुळे जिल्ह्यात त्यांची चर्चा होत आहे.
पंकजा मुंडेही थेट दांडियाच्या मैदानात, परळीत घेतला आनंद
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल परळी शहरामध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला आहे. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येत्या 15 तारखेला त्यांच्या उपस्थित भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंचा हा गरबा चांगलाच चर्चेत आहे.
हेही वाचा- मोठी बातमी: रवी शास्त्रीनंतर द्रविड होणार टीम इंडियाचा कोच! 'या' सीरिजसाठी सांभळणार जबाबदारी
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. यानंतर बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी परळी गाठली. दसऱ्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असताना परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पंकजा मुंडेंनी दांडियाचा मनमुराद आनंद लुटला आहे. यावेळी चिमुकल्या बरोबर गरबा खेळत पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Navneet Rana