मराठी बातम्या /बातम्या /देश /

कारमधून आलेल्या 4 हल्लेखोरांचा पुजाऱ्यावर गोळीबार, बेदम मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू

कारमधून आलेल्या 4 हल्लेखोरांचा पुजाऱ्यावर गोळीबार, बेदम मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू

मंदिराचे मुख्य पुजारी राजीव कुमार झा (Rajeev Kumar Jha)  यांची गोळ्या घालून हत्या केली.

मंदिराचे मुख्य पुजारी राजीव कुमार झा (Rajeev Kumar Jha) यांची गोळ्या घालून हत्या केली.

मंदिराचे मुख्य पुजारी राजीव कुमार झा (Rajeev Kumar Jha) यांची गोळ्या घालून हत्या केली.

  • Published by:  Pooja Vichare

बिहार, 14 ऑक्टोबर: बिहारच्या दरभंगामध्ये (Darbhanga) एका पुजाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरभंगाच्या राज संकुलात असलेल्या कंकाली मंदिराचे मुख्य पुजारी राजीव कुमार झा (Rajeev Kumar Jha) यांची गोळ्या घालून हत्या केली. आज पहाटे 4.30 च्या सुमारास पुजारी पूजा करत असताना ही घटना घडली. दहशत पसरवण्यासाठी, सशस्त्र आलेल्या गुन्हेगारांनी पूजेसाठी आलेल्या व्यक्तीवरही गोळ्या झाडल्या, त्याची प्रकृतीही गंभीर आहे.

4 आरोपी कारमधून आले होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पळून जात असताना आजूबाजूच्या लोकांनी 3 हल्लेखोरांना पकडलं. हल्लेखोरांना लोकांनी लाथा, लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. ज्यात एकाचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती गंभीर आहे. मात्र, एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांना या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. हल्लेखोऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की, बुधवारी संध्याकाळी पुजाऱ्याच्या भाच्याचं काही लोकांशी मोबाईलवरून भांडण झालं होतं.

हेही वाचा- IPL 2021 Final:  ...तर KKR चा विजय पक्का, 'हा' रेकॉर्ड पाहून धोनीची उडणार झोप! 

घटनेची माहिती मिळताच SSP बाबुराम यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. एसएसपीने या घटनेत दोन जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जखमी भक्ताला पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन्ही जखमी गुन्हेगारांना DMCH मध्ये दाखल करण्यात आलं आहे. मृत आणि जखमी गुन्हेगारांची ओळख अद्याप पटलेली नाही. दोन आरोपींची प्रकृती गंभीर आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

बुधवारी संध्याकाळी पुजाऱ्याच्या भाच्याशी भांडण झालं. भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीने पुजाऱ्याच्या भाच्याशी मोबाईलवरुन काही वाद झाला होता. तसंच दारू बंदीनंतर संध्याकाळपासून मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थांचे व्यसन करण्यास गर्दी होते. त्यापैकी एकानं कॉल करण्यासाठी पुजाऱ्याच्या भाच्याकडे मोबाइल मागितला, जो पुजाऱ्याच्या भाच्यानं दिला नाही. या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद झाला.

हेही वाचा- 'Tera yaar hoon main'; व्यंकटेश-आवेशचे मैत्रीप्रेम सोशल मीडियावर व्हायरल

या वादादरम्यान पुजारी राजीव झा दोघांमधला वाद सोडवण्यासाठी आले. हा वाद एकदम टोकाला गेला. वादाचं रुपांतर मारहाणीत झालंय. या मारहाणीत त्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली होती. लोकांचं म्हणणं आहे की, गुरुवारी पहाटे त्याच व्यक्तीसोबत आलेल्या इतर तीन जणांनी मंदिराच्या आवारात झोपलेल्या पुजाऱ्यावर गोळ्या झाडल्या.

First published:

Tags: Bihar