बीजिंग, 26 नोव्हेंबर : आग लागल्यानंतर सगळ्यात आधी आपण पाणी शोधतो. अग्निशामक दलही आग लागल्यानंतर पाण्याचे फवारे मारतात. मात्र कधी, पाण्यालाच आग लागू शकते, असा विचार केला का? कदाचित हे खरं वाटणार नाही पण घरंच असं घडलं आहे. चीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओ चक्क नळात वाहणाऱ्या पाण्यानं पेट घेतलेला दिसत आहे.
चीनच्या ईशान्य चीनमधील लिओनिंग प्रांतातील पांझिन शहरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाण्याजवळ लायटरनं आग लावताना दिसत आहे. काही वेळातच पाण्यानं पेट घेतल्याचे दिसते, हळू हळू ही आग संपूर्ण विहिरीभोवती पसरलेली दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेन नावाच्या महिलेने पोस्ट केला होता. अवघ्या काही सेकंदात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
वाचा-VIDEO:वांद्रे स्टेशनवर तोबा गर्दी! कोरोना टेस्ट न करता मुंबईत पोहोचल 780 प्रवाशी
Videos of flammable tap water in Panjin, NE China's Liaoning have gone viral. The odd scene is caused by natural gas infiltration due to temporary underground water supply system error, which is now shut down. Normal supply has resumed. Further probe will be conducted: local govt pic.twitter.com/a5EOA5SATU
— People's Daily, China (@PDChina) November 24, 2020
वाचा-दारू पिऊन पठ्ठ्यानं थेट घरात घुसवली ऑडी, गाडी रिव्हर्स मारतानाच तुटला दरवाजा
पाण्याला कशी लागली आग?
व्हिडीओ पोस्ट करणार्या महिलेने म्हटले आहे की, तिचे कुटुंब तीन ते चार वर्षांपासून त्रस्त आहे. कव्हर न्यूजशी बोलताना ते म्हणाले, 'बरेच दिवस हात धुऊन किंवा भांडी पाण्याने स्वच्छ केल्यावर हात कोरडे दिसत नव्हते. त्यांच्यात एक चिकटपणा होता. वेन म्हणाले की, याबाबत वडिलांनी स्थानिक पाणीपुरवठा करणार्या कंपनीकडे तक्रार केली मात्र कर्मचार्यांनी त्यांना सांगितले की हे त्यांच्या हातात नाही. त्यांनी सांगितले की ही समस्या गावातील शेकडो कुटुंबांची आहे.
वाचा-रस्ता भटकलेल्या वाघानं केला हल्ला, जीव वाचवण्यासाठी खड्ड्यात मारली उडी तर...
सोमवारी अधिकाऱ्यांनी तज्ज्ञांती चर्चा करून असे म्हटले आहे की, भूगर्भातील पाण्यात कमी प्रमाणात नैसर्गिक वायू गळतीमुळे हे पाणी ज्वलनशील झाले आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. तर, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी नुकताच जल स्टेशन दुरुस्तीमुळे भूजलपुरवठा सुरू झाला आहे. त्याचबरोबर संबंधित कर्मचार्यांना यासाठी जबाबदार धरले जाईल असे सरकारचे म्हणणे आहे.