यॉर्कशायर, 25 नोव्हेंबर : ड्रंक अॅण्ड ड्राइव्हवर बंदी असतानाही सर्रास असे प्रकार घडताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही असे प्रकार घडतात. ब्रिटनमध्ये नुकताच एक भयंकर अपघात घडला. एका किशोरवयीन मुलानं दारू पिऊन गाडी थेट एका घरात घुसवली. जेव्हा त्यानं कार मागे घेतली तेव्हा घराचा मुख्य दरवाजाच बाहेर आला. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. वेस्ट यॉर्कशायर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम यॉर्कशायरच्या ड्यूजबरी येथील घरावर आदळण्यापूर्वी या तरुणानं आणखी एका गाडीला टक्कर दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की, घराचा पुढचा दरवाजा त्याच्या ऑडीच्या विंडशील्डमध्ये घुसला होता, अज्ञात किशोर अपघातानंतर पळून गेला. मात्र पोलिसांनी लगेचच या ऑडिचा फोटो जारी करून युवकाला अटक केली. वाचा- रस्ता भटकलेल्या वाघानं केला हल्ला, जीव वाचवण्यासाठी खड्ड्यात मारली उडी तर…
Ashworth Rd, Dewsbury - Driver collided with a vehicle, then the front porch of a house - before then continuing to drive for several metres with front door attached to car. Driver arrested suspected unfit through drink/drugs. #wypthecost #fatal4 pic.twitter.com/ee8r9ZZc9A
— WYP Roads Policing Unit (@WYP_RPU) November 21, 2020
वाचा- पाहता पाहता स्कूटी भराभर पेटू लागली; तरुणींनी जीव वाचण्यासाठी केलं…पाहा VIDEO मद्यपान किंवा ड्रग्समुळे वाहन चालविल्याच्या संशयावरून वाहन चालकास अटक करण्यात दरम्यान, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर सध्या ही घटना तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, चालक दुखापत झाली नाही. पोलिसांच्या प्रवक्त्याने स्काय न्यूजला सांगितले की, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र त्याला कोणतीही दुखापत झाली नाही आहे.