जाहिरात
मराठी बातम्या / Viral / China Building Fire Video - पाहता पाहता 42 मजले आगीच्या विळख्यात; गगनचुंबी इमारत जळून खाक

China Building Fire Video - पाहता पाहता 42 मजले आगीच्या विळख्यात; गगनचुंबी इमारत जळून खाक

42 मजली इमारत आगीच्या विळख्यात.

42 मजली इमारत आगीच्या विळख्यात.

चीनमध्ये 42 मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बीजिंग, 16 सप्टेंबर : इमारतीला आग लागण्याच्या घटना बऱ्याच घडल्या आहेत. अशीच एक भयंकर घटना घडली आहे चीनमध्ये. एका गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली आहे. 42 मजली इमारत आगीच्या विळख्यात सापडली. पाहता पाहता ही इमारत जळून खाक झाली आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हुनान प्रांतातील चांग्शा शहरातील ही घटना आहे. शुक्रवारी इथल्या इमारतीला आग लागली आहे. माहितीनुसार या बिल्डिंगमध्ये चायना टेलिकॉम कंपनीचं ऑफिसही होतं.  व्हिडीओत तुम्ही पाहू शकता इमारत पूर्णपणे दिसेनाशी झाली आहे. फक्त आगीचे लोट आणि धूरच धूर दिसतो आहे.

जाहिरात

मीडिया रिपोर्टनुसार आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 36 आगीचे बंब आणि 280 अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप नाही. हे वाचा -  घरात व्हिडिओ गेम खेळत असताना अंगावर पडली वीज, आश्चर्यकारकरित्या बचावला तरुण आग कधी कुठे कशी लागेल सांगू शकत नाही. त्यामुळे आग लागल्यानंतर सर्वात आधी तुम्ही काय करायला हवं, ते जाणून घ्या. आग लागल्यास काय करावं? आग लागल्यास सर्वात प्रथम घाबरून जाऊ नये. आग लागली हे कळल्यानंतर इकडेतिकडे धावाधाव न करता स्वतःचं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा. आग विझवण्यासाठी लागणारं कोणतं साधन तुमच्याजवळ आहे हे बघा. लवकरात लवकर पाण्यानं आग विझवण्याचा प्रयत्न करा. शॉर्टसर्किट झाला असल्यास, पाण्याचा वापर करू नये. सर्वप्रथम घरातील मुख्य स्वीच बंद करावा. त्यानंतर आग लागली असल्यास, कोरड्या मातीचा वापर करता येऊ शकेल. अग्निशमन दलाला फोन करून योग्य पत्ता आणि माहिती द्या. हे वाचा -  VIDEO - 16 सेकंदात 2 वेळा समोर आला मृत्यू; या ‘सुरक्षाकवच’मुळे वाचला तरुण उंच इमारतीत असल्यास, खाली उतरण्यासाठी कधीही लिफ्टचा वापर करू नका. उतरण्यासाठी जिन्याचाच वापर करा. एखाद्या खोलीत अडकल्यास, घोंगडी अथवा तत्सम कपड्याचा वापर करून खिडकीच्या दिशेने जाऊन मदतीसाठी धावा करा. खिडकीजवळ जाऊन जास्तीत जास्त मदत मागण्याचा प्रयत्न करा. घरातील कोणत्याही बटणांना हात न लावता लाकडी काठीचा अथवा कोणत्याही लाकडी गोष्टीचा उपयोग करावा. सहसा कोणत्याही बटणांना हात लावणं टाळावं. करंट बसण्याची भीती असल्यामुळे अग्निशामन दलाची वाट पाहावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात