VIDEO : अश्रूंचे झाले मोती, धोनीच्या संतापामुळे दीपक चाहर झाला डेथ ओव्हर किंग!

VIDEO : अश्रूंचे झाले मोती, धोनीच्या संतापामुळे दीपक चाहर झाला डेथ ओव्हर किंग!

टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडनं भारत-बांगलादेश यांच्यात झालेली टी-20 मालिका आपल्या खिशात घातली.

  • Share this:

नागपूर, 11 नोव्हेंबर : टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडनं भारत-बांगलादेश यांच्यात झालेली टी-20 मालिका आपल्या खिशात घातली. जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव किंवा रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकही स्टार खेळाडू नसताना भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली. भारत-बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामना नागपूरमध्ये झाला. नागपूरच्या मैदानावर भारतानं प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला 174 धावांचे आव्हान दिले. मात्र त्यानंतर गोलंदाजी करताना मैदानावर दव असल्यामुळं सुरुवातीला युवा गोलंदाजांची नाचक्की होत होती.

तिसऱ्या सामन्यात एकवेळ भारत पिछाडीवर होता, त्यावेळी दीपक चाहरनं ऐतिहासिक हॅट्‌‌ट्रिक घेत भारताला सामना आणि मालिका विजय मिळवून दिला. चाहरच्या हॅट्‌‌ट्रिकच्या जोरावर भारतानं बाजी मारली, त्याचबरोबर चाहर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे. मात्र एककाळ असा होता, जेव्हा याच दीपक चाहरला कधीही क्रिकेटर बनू शकत नाही, असे दिग्गजांनी सांगितले होते. त्याच बरोबर आयपीएलमधल्या एका सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं चाहरला फैलावर घेतले होते, या सगळ्या प्रकरणामुळं भरमैदानात चाहर रडलाही होता.

वाचा-चाहरचा कहर, हॅट्ट्रिकसह केली विश्वविक्रमाची नोंद

धोनीनं दिलेल्या त्या अश्रूंमुळे चाहर झाला जबरदस्त गोलंदाज

दीपक चाहरच्या (Deepak Chahar) करिअरला कलाटणी मिळाली ती कर्णधार महेंद्रसिंग धोनीमुळं. दीपक चाहरच्या प्रथम श्रेणीमधील कामगिरीच्या जोरावर त्याला चेन्नई सुपरकिंग्ज संघात स्थान मिळाले. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये धोनीनं मुख्य गोलंदाजाप्रमाणे चाहरला संधी दिल्या. हंगामाच्या सुरुवातीला धोनीनं फक्त त्याला सुरुवातीचे चार ओव्हर दिले, त्यानंतर डेथ ओव्हरमध्येही गोलंदाजी दिली. अशाच एका सामन्यात डेथ ओव्हरमध्ये खराब गोलंदाजी केल्यामुळं धोनीनं भरमैदानात चाहरला सुनावले होते. चाहरनं शेवटच्या ओव्हरमध्ये फुलटॉस आणि नो बॉल टाकला होता. त्यावर धोनीनं नाराजी व्यक्त केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

वाचा-असा आहे विराटचा रिटायरमेंट प्लॅन! करणार कधीही न केलेले काम

त्या प्रसंगानंतर चाहर झाला डेथ ओव्हर मास्टर

धोनीनं नाराजी व्यक्त केल्यानंतरच चाहरचे करिअर बदलले. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट घेणारा चाहर डेथ ओव्हरमध्येही कमालीची गोलंदाजी करू लागला. त्यामुळं अशीच कामगिरी चाहरनं बांगलादेश विरोधातही केली. चाहरने नागपूरमधील सामन्यात हॅट्ट्रिकसह 6 गडी बाद करून इतिहास रचला. त्याने 3.2 षटकांत 7 धावा देत 6 गडी बाद केले. बांगलादेशच्या डावाच्या शेवटच्या षटकात त्यानं हॅटट्रिक पूर्ण केली. त्याने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद केला होता. त्यानंतर अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर 2 गडी बाद करून बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला.

वाचा-श्रेयस अय्यरची तुफानी खेळी, तरी ट्विटरवर ऋषभ पंत ‘नंबर 1’

ऐतिहासिक हॅट्‌‌ट्रिक घेत रचला इतिहास

भारताकडून कसोटी हरभजन सिंगने पहिल्यांदा हॅट्ट्रिक केली होती. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेतन शर्मा आणि टी20 दीपक चाहरने ही कमाल केली आहे. 2019 मध्ये तीन भारतीय गोलंदाजांनी हॅट्ट्रिक घेतली आहे. मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरोधात अशी कामगिरी केली होती. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विंडीजविरुद्धच्या कसोटीत हॅट्ट्रिक केली होती. दीपक चाहरने हॅट्ट्रिक घेताच तीनही प्रकारात भारतीय गोलंदाजांनी असा कारनामा केला.

Published by: Priyanka Gawde
First published: November 11, 2019, 1:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या