नवी दिल्ली, 23 जुलै : प्राण्यांचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही थरारक तर काही मजेशीर असतात. सध्या एका प्राण्या चा असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो भावुक करणारा आहे. हा प्राणी आहे प्राणी चिम्पांझी. जो तहानेने व्याकूळ होता. त्याने एका माणसाकडे मदत मागितली. पण त्यानंतर जे घडलं ते पाहिल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. चिम्पांझी माणसांच्या अगदी जवळचे असतात असं म्हटलं जातं. त्यांचं शरीर, चालण्याची पद्धत सर्व काही माणसांसारखंच आहे. चिम्पांझी माणसांप्रमाणेच प्रतिक्रिया देतात, असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. लोक त्यांच्या मजेदार कृत्यावर हसतात आणि कधीकधी ते त्याच्या धोकादायक शैलीमुळे घाबरतात. पण या व्हायरल व्हिडीओ चिम्पाझी माणसाकडे मदत मागताना दिसला आहे.
फ्रेंच वाईल्डलाइफ फोटोग्राफर जेसी पिएरी यांनी आफ्रिकेतील कॅमेरूनमध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. अनरिअल सीन असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. Shocking! घोडाही असं करू शकतो? VIRAL VIDEO पाहून सर्वांनाच बसला धक्का व्हिडीओत पाहू शकता एका पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ एक चिम्पांझी बसला आहे. त्याला खूप तहान लागली आहे. पाणी प्यायचं आहे. त्यासाठी तो एका माणसाची मदत मागतो. हा माणूस म्हणजे फोटोग्राफर जेसीच आहे. चिम्पाझीने बोलवताच जेसी त्याच्या जवळ गेला. चिम्पाझीने त्याला खाली बसायला लावलं. त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि ते पाण्यात बुडवले. त्याच्या हातांच्या ओंजळीत पाणी घेतलं आणि ते तो प्यायला. जशी त्याची तहान तृप्त झाली तसं तो पाणी प्यायचं थांबला. पण त्याने जेसीचे हात सोडले नाहीत. त्याने ते त्याच पाण्यात धुतले. ज्या हातांनी तो पाणी प्यायला ते हात पाण्याने स्वच्छ करून दिले. हा क्षण पाहिल्यावर डोळ्यात अक्षरशः पाणीच येतं. जंगलाच्या राजाच्या हद्दीत घुसली मगर, सिंहाची शिकार पळवण्याचा प्रयत्न; पुढे काय घडलं पाहा VIDEO या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. आम्ही प्राण्यांना पात्र नाही. त्यांचे नैसर्गिक अधिवास वाचवण्यासाठी आपण काय केलं, त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी आपण काय केलं?, असा सवाल केला आहे. तर एकाने चला बदल करूया, तुमच्या वाढदिवशी एक रोप लावायला सुरुवात करा, असं म्हटलं आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटलं, तुमची भावना आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा.