मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! आईस्क्रीम खाता खाता बायकोचा प्रताप, नवऱ्याचे डोळेच फिरले; VIDEO VIRAL

OMG! आईस्क्रीम खाता खाता बायकोचा प्रताप, नवऱ्याचे डोळेच फिरले; VIDEO VIRAL

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब

मुलापासून आईस्क्रिम लपवण्याच्या नादात महिलेने असं काही केलं की नवऱ्याची अवस्था बेकार झाली.

मुंबई, 13 ऑगस्ट : लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आईस्क्रिम (Icecream) खायला आवडतं. पण थंड खाऊन मुलं आजारी पडू नयेत म्हणून शक्यतो आई-वडील मुलांना आईस्क्रिमपासून दूरच ठेवतात मुलांनी आईस्क्रिम (Children eat icecream) खाऊ नये म्हणून त्यांनाही स्वतःवर ताबा ठेवावा लागतो. मग कधी खावंसं वाटलं तर मग मुलांपासून लपूनछपून (Hiding Icecream)  आईस्क्रिम खावं लागतं. असंच लपूनछपून आईस्क्रिम खाणाऱ्या आई-वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मुलापासून लपून आईस्क्रिम खात असताना मध्येच मुलगा येतो. त्यानंतर आईस्क्रिम लपवण्यासाठी पालकांची कशी धडपड सुरू होते आणि या धडपडीत जे काही घडतं, ते पाहून हसू आवरणार नाही.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओत पाहू शकता, एक महिला आणि एक पुरुष दोघंही मस्त बसून आइस्क्रिमचा स्वाद चाखत आहेत.

हे वाचा - वरात दारात, नवरी जोमात! नवरदेवाला पाहताच झाली सैराट; VIDEO VIRAL

दोघंही जसं आईस्क्रिमचं पॅकेट खोलतात तितक्यात त्यांचा मुलगा तिथं येतो. आता त्याने आईस्क्रिम पाहिलं तर तो खाण्यासाठी हट्ट करेल म्हणून आईची आईस्क्रिम लपवण्यासाठी धडपड सुरू होते. पण मुलगा अगदी पाठीच असतो आणि त्यांच्यासमोर आईस्क्रिम लपवता येईल असं दुसरं काहीच नसतं. आईला काहीच सूचत नाही. मग ती घाईघाईत आपलं आईस्क्रिम शेजारी बसलेल्या नवऱ्याच्या टी-शर्टमध्ये टाकते. त्यानंतर त्याच्या हातातील आईस्क्रिमही ती तिथंच लपवते.

हे वाचा - भुकेल्या मगरींना खायला द्यायला गेली आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

मुलापासून आईस्क्रिम लपवण्याच्या नादात तिच्या नवऱ्याची अवस्था मात्र बेकार होते. आईस्क्रिमच्या थंडाव्यामुळे तो गार पडतो. hepgul5 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Food, Funny video, Viral, Viral videos