लखनऊ, 26 नोव्हेंबर : पैसे, मोबाईल, दागिने, गाडी किंवा एखादी मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचं तुम्हाला माहिती आहे. पण कधी कुणी टूथपेस्टही चोरी केल्याचं ऐकलं आहे का? अशीच एक टूथपेस्ट चोरीची घटना समोर आली आहे. त्यातही आश्चर्य म्हणजे टूथपेस्ट चोरी करणाऱ्या या चोराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि त्याला शोधण्यासाठी पोलीस एका राज्यातून दुसऱ्या राज्यातही गेले.
टूथपेस्ट चोरणं हे आश्चर्यकारक आहेच पण त्या टूथपेस्ट चोराला पकडण्यासाठी पोलीसही दुसऱ्या राज्यात गेले हे त्यापेक्षाही धक्कादायक. त्यामुळे तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण ही कोणती फिल्मी नाही नाही तर रिअल लाइफ स्टोरी आहे. दिल्लीतील हे प्रकरण आहे. दिल्लीहून टूथपेस्ट चोरून चोर उत्तर प्रदेशमध्ये पळाला. यूपीच्या बहाइझ जिल्ह्यातील गावात तो राहत होता. पोलीसही त्याच्या मागोमाग त्याच्या गावापर्यंत पोहोचले आणि त्याला बेड्या ठोकल्या.
हे वाचा - 2 राज्यांचे पोलीस शोधत आहेत चोरीला गेलेली चप्पल; नेमकं प्रकरण तरी काय ...
ऊदल कुमार उर्फ संतोष असं या आरोपीचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे. 22 नोव्हेंबरला दिल्लीच्या लाहौरी गेट पोलीस ठाण्यात या प्रकरणाविरोधात तक्कार देण्यात आली. तेव्हापासून पोलीस या चोरट्याच्या शोधात होते. तो यूपीत आपल्या गावात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली.
आता साधी टूथपेस्ट चोरली त्यासाठी काय अटक करायची, असं तुम्हीही म्हणाल. पण मीडिया रिपोर्टनुसार या चोराने फक्त एक-दोन टूथपेस्ट नव्हे तर टूथपेस्टच्या तब्बल 215 पेट्या चोरी केल्या. ज्याची किंमत 11 लाख रुपये आहे.
हे वाचा - Video : सापाला घाबरलेल्या महिलेनं चप्पल फेकून मारली; पुढे जे घडलं ते पाहून व्हाल चकित
टीव्ही 9 हिंदीच्या वृत्तानुसार पोलिसांना चोर आणि चोराने चोरी केलेलं सामानही सापडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Thief, Uttar pradesh, Viral, Viral news