जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! डॉक्टर की जादूगार? ऑपरेशनशिवाय फक्त 3 मिनिटांत चिमुकल्याच्या घशातून बाहेर काढलं नाणं; कसं ते पाहा VIDEO

OMG! डॉक्टर की जादूगार? ऑपरेशनशिवाय फक्त 3 मिनिटांत चिमुकल्याच्या घशातून बाहेर काढलं नाणं; कसं ते पाहा VIDEO

मुलाच्या घशात अडकलं नाणं

मुलाच्या घशात अडकलं नाणं

लहान मुलांच्या घशात नाणं अडकलं की बऱ्याचदा ऑपरेशनची गरज पडते. पण या मुलाच्या घशातील नाणं डॉक्टरांनी ऑपरेशनशिवायच बाहेर काढत कमाल केली आहे.

  • -MIN READ Local18 Madhya Pradesh
  • Last Updated :

हिमांशु अग्रवाल/भोपाळ, 26 एप्रिल :  लहान मुलं खेळता खेळता वस्तू तोंडात घालतात आणि गिळतात किंवा नाकात घालतात. ही वस्तू घशात, अन्ननलिकेत किंवा श्वासनलिकेत अडकते. यामुळे मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि हे मुलांच्या जीवावरही बेतू शकतं. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात एका 5 वर्षांच्या मुलाने पैशांचं नाणं गिळलं, जे त्याच्या घशात अडकलं. पण डॉक्टरांनी ऑपरेशनशिवाय फक्त 3 मिनिटांत हे नाणं मुलाच्या घशातून बाहेर काढलं. मध्य प्रदेशच्या छतरपूरमदील ही घटना आहे. 5 वर्षांचा हा मुलगा ज्याचं नाव लोकेश अहिरवार आहे. बडा मलहरा क्षेत्रात राहणारा लोकेश. ज्याने  पाच रुपयांचं नाणं गिळलं. त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याची अवस्था पाहून कुटुंब घाबरलं. त्यांनी त्याला घेऊन तात्काळ रुग्णालयात धाव घेतली.

News18लोकमत
News18लोकमत

जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. तिथं त्याचे एक्स-रे करण्यात आले. ज्यात ते नाणं त्याच्या घशात अडकल्याचं दिसलं. Yuck! 2 वर्षांच्या चिमुकल्याला असं काही खायला देते आई की वाचूनच उलटी येईल; कारणही अजब मुलांनी नाणं गिळलं की ते बाहेर कसं काढणार हीच चिंता असते. अशा प्रकरणात ऑपरेशनची गरज पडते. पण या मुलावर ऑपरेशन न करता वेगळ्या मार्गाने नाणं बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. डॉक्टर मनोज चौधरी म्हणाले, मुलाने खेळाखेळात पाच रुपयाचं नाणं गिळं, जे त्याच्या अन्ननलिकेत अडकलं होतं. मुलाच्या घशात वेदना होत होत्या. त्याला उलट्या होत होत्या. एक्स-रे करून आम्ही त्याच्या घशात नाणं नेमकं कुठे अडकलं ते पाहिलं. अशा प्रकरणाच बऱ्याचदा ऑपरेशनची गरज पडते. पण या मुलाच्या घशातील नाणं ऑपरेशनशिवाय काढण्यात आम्ही यशस्वी झालो. रबर ट्युबच्या मदतीने दोन-तीन मिनिटांतच ते नाणं बाहेर काढलं. लहान बाळानं एखादी वस्तू गिळली तर होऊ शकतात गंभीर परिणाम, लगेच करा ‘हे’ काम! यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओही बनवला असल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.

लहान मुलांना पैशांचं नाणं देऊ नका. कारण खेळताना ते गिळतात आणि अन्ननलिकेत अडकतं. यामुळे जखम होते, आतड्यांनाही हानी पोहोचू शकते, असं आवाहन डॉ. चौधरी यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात