मुंबई, 16 एप्रिल : लहान बाळ कधी काय गिळेल याचा नेम नाही. अनेकदा पालकांच्या दुर्लक्षाचा फटका बाळालाही बसतो. खेळता खेळता बाळाने नाणं, सेप्टी पिन, बटन सेल गिळाल्याची गंभीर प्रकरणं अनेकदा समोर आल्या आहेत. अशावेळी वेळीच लक्ष दिलं नाही, तर बाळाच्या जीवावरसुद्धा बेतू शकते. त्यातही बटन सेल गिळाल्याची घटना खूपच गंभीर असते. अशावेळी बाळाने बटन सेल गिळल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे, हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. ‘नवभारत टाइम्स’ ने याबाबत वृत्त दिलंय. काय आहेत लक्षणं? लहान बाळ चालायला शिकल्याबरोबर इकडच्या तिकडच्या वस्तू उचलतं आणि तोंडात घालतं. अशावेळी जर बाळाने प्लॅस्टिक, काच किंवा इतर कोणतीही धातुची वस्तू गिळली, तर ते त्याच्या जीवासाठी खूपच धोकादायक ठरू शकते. अनेकदा तर बाळाने बटन सेल गिळल्याच्या घटनाही समो येतात. हे बाळासाठी अत्यंत धोकादायक आहे. यामुळे पचनमार्गात जळजळ आणि संपूर्ण ऊतींचा नाश होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये यामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो. बाळाच्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगणं फार महत्वाचं आहे. मात्र, पालकांना सतत बाळासोबत राहणं शक्य होत नाही. अशावेळी जर बाळाने बटन सेल गिळला तर तुम्ही त्याचे प्राण वाचवण्यासाठी नेमकं काय करू शकता, हे जाणून घेऊ.
ही आहेत लक्षणं - रक्ताच्या उलट्या होणं - आजारी पडणं - सुस्ती येणं - अचानक खोकला येणं - छातीत किंवा घशात वेदना जाणवणं - घनपदार्थ खाता न येणं - भूक न लागणं कशी घेणार काळजी? -जर एखाद्या बाळाने बटन सेल गिळला असेल तर त्याला पिण्यासाठी पाणी द्या. - बाळाला ब्रेडचा तुकडासुद्धा देता येतो. कारण सेल हा ब्रेडमध्ये अडकू शकतो. तसेच तोंडाच्या आत तयार झालेल्या लाळेमुळे गिळलेली वस्तू बाहेर काढण्यात खूप मदत होते. - बटन सेल गिळल्यानंतर बाळाला खोकला येऊ लागल्यास त्याला मांडी घालून झोपायला लावा. यानंतर, त्याच्या पाठीवर जोरदार थाप द्या. - उशीर न करता बाळाला डॉक्टरकडे घेऊन जा. - बाळाचं संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अशा गोष्टी घराभोवती न ठेवणं. बटन सेलमुळे होऊ शकतो मृत्यू बाळाने चुकून बटन सेल गिळला तर तो अन्ननलिकेत अडकू शकतो. यामुळे अन्न नलिकेला छिद्रदेखील पडू शकतं. सेलमधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे शरीरात कॉस्टिक सोडा तयार होऊ शकतो. हा अन्ननलिकेद्वारे धमनीमध्ये गेल्यास तेथे जळजळ होऊ शकते. तसेच अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यास मृत्यू देखील होऊ शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया दोन तासांपेक्षा कमी कालावधीत होते. फक्त प्रेग्नन्सीच नाही या 6 कारणांमुळेही महिलांना येते चक्कर, असू शकते मोठ्या आजारांचे लक्षण याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये टिनी हार्ट्स एज्युकेशनच्या तज्ज्ञांनी अशा प्रकरणात रासायनिक बर्न कमी करण्याचा एक छोटासा मार्ग सूचवला आहे. तज्ज्ञांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की, ‘संशोधनात असं दिसून आलं आहे की, सेलमुळे होणाऱ्या नुकसानाला रोखण्यासाठी मध उपयोगी टरू शकतो. यामुळे बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळू शकतो.’ तुमच्या बाळाने बटन सेल गिळला आहे, तर अशी तुम्हाला शंका असेल त्याला हॉस्पिटलला घेऊन जाताना दर 10 मिनिटांनी 10 मिली मध द्या. परंतु बाळाचे वय 1 वर्षापेक्षा जास्त असेल तरच मध द्या. डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत बाळाला मधाशिवाय दुसरे काहीही खाण्यास घालू नका. दरम्यान, बाळाने एखादी वस्तू गिळल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा त्याच्यापासून अशा वस्तू दूर ठेवण्याची सवय खूप चांगली आहे. ही सवय स्वतःसह घरातील इतरांना लागावी यासाठीही प्रयत्न करा.