मुंबई, 25 जुलै : साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, ज्यांना सापाची बिलकुल भीती वाटत नाही, यात लहान मुलंही आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका बाळाने सापाला धरलं आहे. विषारी आणि खतरनाक समजला जाणारा कोब्रा साप बाळासमोर आला, फणा काढून उभा राहिला आणि बाळाने त्याचा फणा आपल्या हातात धरला. पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या अंगाचं पाणी पाणी होईल.
लहान मुलांना समोर दिसेल ती वस्तू हातात घेण्याची सवय असते. विचार करा, त्यांच्यासमोर एखादा कोब्रा साप आला तर... आता हा साप आहे, तो धोकादायक आहे हे त्यांना माहिती नसतं. त्यांच्याासाठी ते खेळणंच. अशाच एका चिमुकल्यासमोर कोब्रा साप आला आणि फणा काढून उभा राहिला. सापाचा फणा पाहताच चिमुकल्याने हात पुढे केला आणि फणा आपल्या हातात धरला.
हे वाचा - Video : जेव्हा मगरीचं कॉस्ट्यूम घालून तो खऱ्या मगरीजवळ येतो, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
व्हिडीओत पाहू शकता हा मुलगा इतका लहान आहे की त्याला नीट बोलता आणि चालताही येत नसेल. त्याच्यासमोर लांबलचक खतरनाक कोब्रा फणा काढून आहे. सापाला पाहताच चिमुकला हात पुढे करत त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बऱ्याच वेळा तो त्या सापाला धरतो. साप त्या चिमुकल्याच्या अंगावर जातो. त्याच्या तोंडाजवळही जातो. पाहूनच आपल्याला धडकी भरते.
View this post on Instagram
अवघ्या 30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओच्या शेवटपर्यंत तरी सापाने मुलाला काही दुखापत केल्याचं दिसत नाही आहे. पण सापही इतका खतरनाक दिसतो आहे की या चिमुकल्या जीवाला अशा जीवघेण्या प्राण्यासोबत मस्ती करताना पाहून आपल्या हृदयाची धडधड वाढते.
हे वाचा - दिसेल तिथं या कीड्याला ठेचून मारा नाहीतर...; शिकारीची पद्धत वाचूनच अंगाचं पाणी पाणी होईल
हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एका युझरने सापाचे दात तोडून त्याचं विष काढल्याचं म्हटलं आहेत. तर अनेकांनी त्याच्या पालकांनी असं करू दिल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal