मुंबई, 03 जून : लहान मुलं खेळता खेळता काय करतील याचा नेम नाही. कशापासून आपल्याला धोका आहे याची कल्पना त्यांना नसते. त्यांच्यासाठी प्रत्येक वस्तू खेळणं असते. पण हे त्यांच्या जीवावरही बेतू शकतं. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोन भावांचा हा व्हिडिओ आहे. दोघंही खेळत होते. खेळता खेळता ते अचानक एका वॉशिंग मशीनसमोर आले. मशीनचा दरवाजा खुला होता. ते पाहून लहान भाऊ मशीन मध्ये घुसला. त्यानंतर मोठ्या भावाने स्विच ऑन केलं. पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगा गाडीवर खेळतो आहे. गाडी चालवता चालवता तो वॉशिंग मशीनजवळ येतो. वॉशिंग मशीन चा दरवाजा उघडा आहे. म्हणून तो गाडीवर उभा राहतो आणि त्या मशीन मध्ये घुसतो. मशीन च्या ड्रायर मध्ये तो जाऊन बसतो. जेव्हा तो आत जातो तेव्हा सुरुवातीला मशीन वरील स्विच ऑन करण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्याने काही ते होत नाही. काय हा चमत्कार! अवघ्या 3 दिवसांचं बाळ ‘चालू’ लागलं; विश्वास बसत नाही तर पाहा Viral Video हे सर्व करत असताना त्याचा मोठा भाऊ ही तिथेच होता. लहान भावाला मशीन मध्ये गेलेलं पाहताच तो धावत आला आणि त्याने मशीन वरील स्विच ऑन केलं. त्यानंतर मशीन च्या आत असलेला मुलगा गरागरा फिरू लागला. व्हिडिओ पाहिल्यावर मुलांनी असं काही पहिल्यांदाच केलेलं नाही. याआधीही त्यांनी असं केल्याचं दिसतं आहे. पण यामुळे मुलांच्या जीवाला मोठा धोका आहे. सुदैवाने या प्रकरणात मुलाला काही झालं नाही आहे. पण या पालकांचा थोडासाही निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर बेतू शकतो. Video Viral: मेकअप करून समोर आलेल्या आईला मुलाने ओळखलंच नाही, केलं असं काही की महिला शॉक @Journo_Surabhi ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.