नवी दिल्ली 02 जून : मेकअपमध्ये मोठी ताकद असते. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक मेकअपच्या मदतीने त्यांचा मेकओव्हर करतात. ज्या व्यक्तीचं रूप फार चांगलं नसतं, तो मेकअप करून अतिशय सुंदर दिसू लागतो. पण यात मेकअप आर्टिस्ट जबरदस्त असणं गरजेचं आहे. जर आर्टिस्टकडे अशी गोष्ट असेल की तो एखाद्याचा मेकओव्हर नैसर्गिक पद्धतीने करू शकतो, तर क्लायंटला सुंदर दिसण्यापासून काहीही रोखू शकत नाही. या मेकअपची ताकद दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेनं पार्लरमध्ये तिचा मेकअप करून घेतला. यानंतर ती पुन्हा मुलाकडे आली असता आईला पाहून मूल जोरजोरात रडू लागलं. मेकअप केल्यानंतर मुलाला त्याच्या आईला ओळखता आलं नाही. मुलगा आईला विचारू लागला, की आई कुठे आहे. यामुळे तो सतत रडत राहिला. Video Viral: विनाकारण कुत्र्याला त्रास देत होती, त्याने उठून असा धडा शिकवला की पाहून हसू आवरणार नाही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला तयार होताना दिसत आहे. लग्नाच्या सीझनमध्ये आई पार्टीसाठी तयार होत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. निळ्या रंगाचा लेहेंगा घातलेली महिला पार्लरमधून मेकअप करून आली. सोफ्यावर बसलेलं मुल आईची वाट पाहत होतं. मात्र जेव्हा महिला मेकअप करून बाहेर आली तेव्हा मुलाला त्याच्या आईला ओळखता आलं नाही. तो जोरात रडत राहिला आणि आईला बोलवण्याचा हट्ट करू लागला.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर visagesalon1 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मेकअप सलूनचे हे इन्स्टा पेज विविध प्रकारच्या मेकअप व्हिडिओंनी भरलेले आहे. यावर हा मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या. एका व्यक्तीने लिहिलं की, मुलाने ओळखलं नाही हे ठीक आहे पण वडिलांनी ओळखलं नाही तर अवघड होईल. त्याचवेळी, एका वडिलांनी आपला अनुभव सांगितला की त्याच्या मुलानेदेखील दाढी केल्यानंतर त्याला ओळखलं नाही.