Home /News /viral /

भलतंच घडलं! मुलासोबत खेळण्यासाठी घरी आणला चिम्पांजी, आईचा लाडका काही महिन्यातच बनला माकड

भलतंच घडलं! मुलासोबत खेळण्यासाठी घरी आणला चिम्पांजी, आईचा लाडका काही महिन्यातच बनला माकड

एक लहान मुलगा चिम्पांजीसोबत राहून-राहून स्वत:लाही चिम्पांजीच (chimpanzee) समजू लागला. पण हा मुलगा नेमका चिम्पांजीसोबत कसा राहू लागला? वाचा नेमकं काय घडलं?

  नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : आपण सर्वांनीच मोगलीची गोष्ट ऐकली असेल. एक लहान मुलगा जंगली प्राण्यांसोबत जंगलात राहतो. तो त्यांच्यामध्ये राहत-राहत इतका त्या जंगली प्राण्यांमध्ये मिसळून जातो, की स्वत:लाही जंगली प्राणीच समजतो. ही केवळ एक गोष्ट होती. पण अगदी अशीच एक खरी घटनाही समोर आली होती. या घटनेने अनेकांना हैराण केलं होतं. एक लहान मुलगा चिम्पांजीसोबत राहून-राहून स्वत:लाही चिम्पांजीच (chimpanzee) समजू लागला. पण हा मुलगा नेमका चिम्पांजीसोबत कसा राहू लागला? वाचा नेमकं काय घडलं? मानसशास्त्रज्ञ विंथ्रॉप (Winthrop) आणि लुएला केलॉग (Luella Kellogg) यांचा एक लहान मुलगा डोनाल्ड (Donald) होता. इतर मुलांप्रमाणे तोदेखील चंचल होता. पण मानसशास्त्रज्ञ असलेल्या विंथ्रॉपने आपला मुलगा डोनाल्डसाठी काही वेगळाच प्लॅन केला. मानसशास्त्रज्ञ विंथ्रॉपला आपला मुलगा त्याच्या एका एक्सपेरिमेंटचा भाग व्हावा असं वाटत होतं. त्यामुळे त्याने एक मादी चिम्पांजी घरी आणला. त्याने त्या चिम्पांजीच नाव Gua असं ठेवलं आणि ती डोनाल्डची बहिण असल्याचं म्हटंल. लहानग्या डोनाल्डच्या आई-वडिलांचा यामागे एक्सपेरिमेंट (Chimpanzee Child Experiment) करणं हा उद्देश होता. पुढील पाच वर्षात मुलगा आणि माकड या दोघांचं एकत्रित पालनपोषण करायचं जेणेकरुन चिम्पांजीमध्ये काय-काय बदल होतात, याचा अभ्यास करता येईल. माकडावरील परिणाम पाहण्यासाठी हे एक्सपेरिमेंट करण्याचं ठरवण्यात आलं होतं. ज्यावेळी हे एक्सपेरिमेंट सुरू झालं त्यावेळी चिम्पांजी 7 महिन्यांचा होता. तर लहान मुलगा डोनाल्ड 10 महिन्यांचा होता. या एक्सपेरिमेंटच्या ज्या परिणामांचा त्यांनी विचार केला होता, त्याच्या उलट भयंकर परिणाम झाले.

  बेडखालून येत होते विचित्र आवाज, जगातील सर्वात विषारी किटकाला पाहून हादरला व्यक्ती

  चिम्पांजी आणि मुलावरचं हे एक्सपेरिमेंट 1931 मध्ये सुरू झालं होतं. त्या दोघांना एकच कपडे घातले जात होते. जेवणही एकच दिलं जात होतं. एकाच अंथरुणात दोघांना झोपायला दिलं जात आहे. दोघांना सारखीच खेळणीही दिली गेली. चिम्पांजीसोबत माणसाप्रमाणे बोललं जात होतं. दोघांना एकाच वातावरणात ठेवलं गेलं. हे एक्सपेरिमेंट 5 वर्ष करायचं त्या मुलाच्या वडिलांनी ठरवलं होतं. परंतु हे केवळ 9 ते 10 महिन्यातच बंद करावं लागलं. माकड आणि मुलगा यांना एकत्र ठेवल्याने माकडावर काय परिणाम झाले हे पाहायचं होतं. चिम्पांजी कसा रिअॅक्ट करतो, हे त्यांना पाहायचं होतं. मात्र या 9 ते 10 महिन्यांच्या काळात चिम्पांजीवर कोणताही परिणाम न होता, लहान मुलावर विचित्र, भयंकर परिणाम झाले. त्यांचा मुलगाच चिम्पांजी सारखं वागू लागला. मुलगा जेवण मागण्यासाठी चिम्पांजीप्रमाणे गुरगुरू लागला, लोकांना चावू लागला.

  ऑनलाइन Ludo खेळताना जडलं प्रेम, लग्नासाठी तरुणीने केला 1,650 किमीचा प्रवास;पण...

  या कपलने 1933 मध्ये या शोधावर एक पुस्तकही लिहिलं. ‘The Ape and the Child: A study of environmental influence upon early behaviour’ असं त्या पुस्तकाचं नाव होतं. या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, की मुलगा जसं-जसं बोलू लागत होता, तसं त्याचा मेंदू वेगाने चालत होता. तर दुसरीकडे चिम्पांजी अधिकच ताकदवान होत होता. चिम्पांजीमुळे आपल्या मुलावर गंभीर परिणाम होत असल्याने चिम्पांजीला ऑरेंज पार्कमध्ये सोडावं लागलं आणि त्यानंतर हे एक्सपेरिमेंट बंद झालं. परंतु या एक्सपेरिमेंटने मुलाला संपूर्ण बदलवलं होतं. एक्सपेरिमेंटचा परिणाम असा झाला, की केवळ 43 वर्षातच डोनाल्डने आपला स्वत:चा जीव घेतला.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Chimpanzee, Small child

  पुढील बातम्या