चेन्नई, 28 ऑक्टोबर : अद्यापही बऱ्याच ठिकाणी मुक्या जीवांचा बळी दिला जातो. अशाच एका प्रकरणात बळी देणाऱ्याचाच बळी गेला आहे. कोंबड्याचा बळी द्यायला गेलेल्या व्यक्तीचाच जीव गेला आहे. देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. असंच या प्रकरणात घडलं आहे. पण इथं माणसाचा नव्हे तर ज्या मुक्याचा जीवाचा जीव वाचला आहे. मुक्या जीवाचा जीव घेणाऱ्या माणसाचाच जीव गेला आहे.
तामिळनाडूच्या चेन्नईमधील ही धक्कादायक घटना आहे. इथं नियतीचा अजब खेळ दिसून आला आहे. कोंबड्याचा बळी देताना बळी देणाऱ्या व्यक्तीचाच मृत्यू झाला आहे. पल्लावरम इथल्या एका घराच्या गृहप्रवेशावेळी ही धक्कादायक घटना घडली आहे.
एका निर्माणाधीन घऱात गृहप्रवेश ठेवण्यात आला होता. यावेळी इथं कोंबड्याची बळी देण्याची प्रथा आहे. ज्या व्यक्तीच्या घराचं काम सुरू होतं, तिथला केअर टेकर बळी देण्याचंही काम करत होता. त्यामुळे त्यालाच हे काम सोपवण्यात आलं. पण कोंबड्याचा बळी देण्याऐवजी त्याचाच बळी गेला. कोंबड्याचा बळी देण्याआधी असं काही घडलं की बळी देणाऱ्याचाच मृत्यू झाला पण बळीचा कोंबडा वाचला.
हे वाचा - कुत्र्याचं मांस पॅक करताना सेलिब्रेटिने काढला VIDEO, सोशल मीडियावर उडाली खळबळ
कोंबड्याचा बळी तिसऱ्या मजल्यावर दिला जाणार होता. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ही व्यक्ती जिन्यामार्फत एकटी इमारतीच्या सर्वात वरच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. या बिल्डिंगमध्ये जिथं लिफ्ट लागणार होती ती जागा अशीच मोकळी सोडण्याच आली होती. लिफ्टसाठी असलेल्या या जागेतच त्या व्यक्तीचा पाय पडला आणि ती कोसळली.
त्यावेळी तिच्या हातात कोंबडाही होता. जो तिच्या हातातून सुटण्यासाठी धडपडत होता, उडण्याचा प्रयत्न करत होता.
हे वाचा - समुद्राच्या पाण्याखाली जेव्हा त्यांचा शार्कशी होतो सामना! काय होतं पाहा थरारक Video
एशियाने न्यूजच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितलं की, त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला. ज्या कोंबड्याचा बळी दिला जाणार होता, त्याला काहीच झालं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tamil nadu, Viral