जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! ऑमलेट बनवण्यासाठी फोडलं अंडं आणि...; त्यातून जे बाहेर पडलं ते पाहून सर्वजण शॉक; VIDEO VIRAL

OMG! ऑमलेट बनवण्यासाठी फोडलं अंडं आणि...; त्यातून जे बाहेर पडलं ते पाहून सर्वजण शॉक; VIDEO VIRAL

OMG! ऑमलेट बनवण्यासाठी फोडलं अंडं आणि...; त्यातून जे बाहेर पडलं ते पाहून सर्वजण शॉक; VIDEO VIRAL

अंड्याचा एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी : अंडं (Egg video) फोडलं तर त्या अंड्यातून अंड्यातील पिवळा आणि पांढरा भाग बाहेर पडतो. काही वेळा अंडं फोडल्यानंतर ते खराब असू शकतो, त्यावेळी अंड्यातील आतील या भागाचा रंग बदलेला दिसू शकतो. पण अंडं फोडल्यानंतर अंड्यातून बलकाऐवजी दुसरं काही बाहेर पडलं तर…(Egg shocking video) सध्या असाच एक शॉकिंग व्हिडीओ (Shocking video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने ऑमलेट बनवण्यासाठी म्हणून अंडं फोडलं. पण त्या अंड्यातून असं काही निघालं की सर्वांनाच धक्का बसला. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती ऑमलेट बनवत असते. त्या व्यक्तीच्या आसपास बरेच लोक आहेत. सुरुवातीला ही व्यक्ती एक अंडं फोडते आणि तव्यावर टाकते. त्या अंड्यातून अंड्याचा बलकच बाहेर पडतो. त्यानंतर ही व्यक्ती दुसरं अंडं घेते आणि तेसुद्धा तव्यावर फोडते. तेव्हा त्या अंड्यातून बलक नाही तर चक्क कोंबडीचं एक पिल्लू बाहेर पडतं (Chick Viral Video). हे वाचा -  VIDEO- आजोबांनी नोरा फतेहीलाही दिली टक्कर; जबरदस्त ठुमके पाहून तोंडात घालाल बोटं

तवा गरम असल्याने अंड्यातून तव्यावर पडताच कोंबडीचं पिल्लू पळू लागतं. अंडी फोडणाऱ्या व्यक्तीचंही लक्ष जातं आणि तो त्या कोंबडीच्या पिल्लाला पटकन तव्यावरून उचलून आपल्या हातात घेतो. असं एक वेळा नाही तर तीन वेळा होतं. ही व्यक्ती लागोपाठ तीन अंडी फोडते आणि त्या तिन्ही अंड्यातून कोंबडीचं पिल्लू बाहेर पडतं.

जाहिरात

ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याची माहिती नाही. पण सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. हे वाचा -  बोटीतून पडला तरुण तो थेट पाणघोड्याच्या जबड्यात आणि…; अंगावर काटा आणणारी घटना हा व्हिडीओ पाहून काही नेटिझन्स हैराण झाले आहेत. तर काही युझर्सनी हा व्हिडीओ एडिट केल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओत किती तथ्य आहे माहिती नाही.  त्यामुळे न्यूज 18 लोकमतही या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात