Home /News /viral /

OMG! आजोबांनी तर नोरा फतेहीलाही टक्कर दिली; VIDEO मध्ये जबरदस्त ठुमके पाहून तोंडात घालाल बोटं

OMG! आजोबांनी तर नोरा फतेहीलाही टक्कर दिली; VIDEO मध्ये जबरदस्त ठुमके पाहून तोंडात घालाल बोटं

गाण्याच्या तालावर आजोबांनी लचकवली आपली कंबर.

    मुंबई, 11 फेब्रुवारी : कंबर लचकवणं तशी ही महिलांची खासियत तरी ते सर्वच महिलांचं जमतं असं नाही. बेली डान्सर अभिनेत्री नोरा फतेहीच्या ठुमक्याचे तर बरेच लोक दिवाने आहेत. पण एका आजोबांनी मात्र नोरा फतेहीसारख्या कंबर लचकवणाऱ्या कित्येक महिलांना टक्कर दिली आहे (Old man dance video). त्यांनी जबरदस्त ठुमके लगावले आहेत. सोशल मीडियावर एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत हे आजोबा डान्स करताना दिसत आहे. त्यांनी इतके जबरदस्त ठुमके लगावले आहेत की पाहून तुम्हीसुद्धा तोंडात बोटं घालाल. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता काही महिला बॉलिवूडमधील हिंदी गाण्यावर नाचत आहेत. त्यांच्यामध्ये ही वयस्कर व्यक्तीही नाचते आहेत. लटक मटक आपली कंबर हलवताना दिसते आहे. हे वाचा - VIDEO - पॅराग्लाइडरची मदत करताना हवेत उडाला तरुण; उंचावर जाताच हात सुटला आणि... दिल चोरी साड्डा हो गया हे हिंदी फिल्मचं गाणं ऐकायला येत आहे. या गाण्याच्या ठेक्यावरच आजोबांनी ताल धरला आहे. गाण्याच्या तालातच ते आपले कंबर हलवत आहेत. डान्सचा मनमुराद आनंद घेत आहेत.  आजोबांना असं नाचताना पाहून महिलाही थक्क झाल्या आहेत. तिथं उपस्थित असलेले लोकही टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. या वयातही आजोबांचा असा जोश, उत्साह पाहून नेटिझन्सही थक्क झाले आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Dance video, Old man, Viral, Viral videos

    पुढील बातम्या