• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • लग्नसमारंभासाठी भोजन बनवताना शेफचा घसरला पाय; उकळत्या चिकन सूपमध्ये कोसळला अन्...

लग्नसमारंभासाठी भोजन बनवताना शेफचा घसरला पाय; उकळत्या चिकन सूपमध्ये कोसळला अन्...

एका लग्नसमारंभात (Wedding Party) भोजन बनवत असताना एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत शेफला (Chef) आपला जीव गमवावा लागला आहे.

 • Share this:
  बगदाद 02 जुलै: एका लग्नसमारंभात (Wedding Party) भोजन बनवत असताना एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत शेफला (Chef) आपला जीव गमवावा लागला आहे. जेवण बनवत असताना हा शेफ पाय घसरून गरम चिकन सूपच्या (Chicken Soup) कढईत कोसळला. यात तो 70 टक्के टक्के जखमी झाला. यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरही (Doctor) या व्यक्तीला वाचवू शकले नाहीत. या घटनेनंतर रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या (Hotel) किचनमधील सुरक्षेबाबत वाद सुरू झाला आहे. पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याच्या आत्महत्येमागचं खरं कारण समोर, ऐकून बसेल धक्का द सननं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना इराकच्या जाखो जिल्ह्यातील हेजल हॉलमध्ये घडली आहे. याठिकाणी 25 वर्षीय शेफ इस्सा इस्माइल वेडिंग पार्टीसाठी भोजन तयार करत होता. अचानक त्यांचा पाय घसरला आणि तोल जाऊन ते उकळत्या सूपमध्ये कोसळले. यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाच दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, ही झुंज अपयशी ठरली. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. लग्नाच्या काही तास आधी नवरीच्या आईचा मृत्यू, कुटुंबीयांचा निर्णय ऐकून सगळे हैराण इस्सा इस्माइल गेल्या अनेक वर्षांपासून शेफचं काम करतात. त्यांच्या एका नातेवाईकानं सांगितलं, की इस्माइल वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी भोजन बनवत असतं. सध्या ते दोन पार्टी हॉलसाठी काम करत होते. इस्माइल यांनी तीन मुलं असून या घटनेनंतर त्यांना मोठा धक्का बसल्याचंही नातेवाईकानी सांगितलं. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, या हृदयद्रावक घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सध्या हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. लोकांचं असं म्हणणं आहे, की रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या किचनमध्ये योग्य ते सुरक्षेचे उपाय केले गेले पाहिजेत. काही यूजर्सचं असं म्हणणं आहे, की बऱ्याच हॉटेलमध्ये सुरक्षेवर विशेष लक्ष दिलं जातं नाही. याच कारणामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात.
  Published by:Kiran Pharate
  First published: