जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पक्ष्यावर धरला बंदुकीचा नेम आणि शिकाऱ्यावरच लागला निशाणा... नेमकं काय घडलं पाहा VIDEO

पक्ष्यावर धरला बंदुकीचा नेम आणि शिकाऱ्यावरच लागला निशाणा... नेमकं काय घडलं पाहा VIDEO

पक्ष्यावर धरला बंदुकीचा नेम आणि शिकाऱ्यावरच लागला निशाणा... नेमकं काय घडलं पाहा VIDEO

जिथं पक्ष्याची शिकार (hunting bird) केली, तिथंच या शिकाऱ्याला त्याची शिक्षा मिळाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 फेब्रुवारी : शिकार (animal hunting) करणं कायद्यानं गुन्हा आहे. तरीदेखील कित्येक लोक आपल्या हौशेसाठी, मजेसाठी मुक्या जीवांची शिकार करतात. पण म्हणतात ना जैसी करनी वैसी भरनी किंवा कर्माची फळं इथंच भोगावी लागतात आणि हेच प्रत्यक्षात दाखवणारा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. ज्यामध्ये एका पक्ष्याची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यासोबत नेमकं काय घडलं ते तुम्ही पाहाच. IFS ऑफिसर सुसांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक शिकारी पक्ष्याची शिकार करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता शिकारी बंदूक घेऊन हवेत उडणाऱ्या पक्ष्यावर नेम धरतो. बंदुकीतून गोळी झाडतो. त्याच्या निशाणा अचूक लागल्यानं पक्षी जखमी होते. हवेत स्वच्छंद उडत असलेला हा पक्षी जखमी होताच जमिनीच्या दिशेनं येतो. पण तो थेट सरळ खाली पडत नाही तर शिकारीच्या दिशेनं उडत येतो आणि शिकाऱ्याच्या डोळ्याला आपटतो. हे वाचा -  मुक्या जीवाला मारताच शिकारीच झाला बंदुकीचा शिकार; नेमकं काय घडलं पाहा VIDEO याआधीदेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये मुक्या जीवाला मारताच शिकारीच (hunter) स्वत:च्या बंदुकीचा शिकार झाला होता. ज्या क्षणी शिकारी शिकार करतो त्याच्या दुसऱ्याच क्षणी त्याला त्याची शिक्षाही मिळते, असा हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. एक व्यक्ती शिकार करतो आहे. काही अंतरावरच असलेल्या प्राण्यावर तो आपल्या बंदुकीचा नेम धरतो. निशाणा साधतो. एक गोळी त्या प्राण्यावर झाडतो. शिकाऱ्याचा नेमही अचूक लागतो. त्याच्याजवळ असलेल्या एका लाकडाच्या आधारावर तो बंदूक उभी करतो आणि ज्या प्राण्याची शिकार केली त्याच्या दिशेनं तो जातो. काही अंतरापर्यंत तो जातो आणि ज्या लाकडाच्या आधारे तो बंदूक उभी करतो ते लाकूड पडतं सोबत बंदूकही पडते आणि बंदुकीतून आपोआप गोळी सुटते. बंदुकीतून बाहेर पडलेली गोळी थेट लागते ती त्या शिकाऱ्याला. त्याचा पायावर ही बंदूक लागते आणि तो जमिनीवरच कोसळतो. त्यानंतर कसाबसा स्वत:ला सावरत तो उभा राहतो. हे वाचा -  कांगारूला त्रास देत होता व्यक्ती; त्याने असा घेतला बदला की…; VIDEO VIRAL आपल्या कर्माची फळं इथंच भोगावी लागतात ती अशी. एका मुक्या जीवाची त्यानं निर्दयीपणं शिकार केली. त्याच्या जीवाचा थोडाही विचार केला नाही. अगदी हुशारीनं त्याच्यावर बंदूक ताणली. पण दुसऱ्याच क्षणी त्यालाही त्याची शिक्षा मिळाली.  या व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. कर्माचं फळ मिळालं, ऑन द स्पॉट निर्णय, अशा प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर उमटत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात