मुंबई, 12 जून : प्रत्येकाच्या आयुष्यात काही तरी प्रॉब्लम्स नक्कीच असतात. मग ते माणसं असोत किंवा माग प्राणी. माणसांप्रमाणेच प्राण्यांचं आयुष्य देखील अनेक धोक्यांनी भरलेलं आहे. जंगलातील नियमच वेगळे आहेत. इथे एकाचं पोटभरण्यासाठी दुसऱ्या प्राण्याची शिकार होते. जंगलातील शिकारीचा थरार खरोखर अंगावर काटा आणणारा असतो. यासंबंधीत अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सिंहाचा कळप एका म्हशीच्या मागे लागला आहे. तसे पाहाता सिंह हा जंगतील खतरनाक शिकारी आहे, म्हणून तर त्याला जंगलाचा राजा म्हणतात. त्यामुळे सहाजीकच म्हशीची शिकार होईल असं तुम्ही मानाल पण असं नाही. तरुण बाईकवरुन जात असताना, रस्त्याच्या कडेला दिसला सिंह आणि… पुढे जे घडलं ते व्हिडीओत कैद या एकट्या म्हशीनं सिंहाच्या कळपाला चांगलंच पाणी पाजलं आहे. या व्हिडीओवर एक शिकवण नक्कीच मिळते की तुम्ही जर मनात ठरवलं आणि हिंमत हारली नाही तर तुम्ही काहीही करु शकता. King Cobra : साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का? व्हिडिओत जे घडलं त्याची कल्पना करू शकत नाही नक्की काय घडलं? तळ्याकाठी पाणी प्यायला आलेल्या म्हशीवर सिंहाच्या कळपाने हल्ला केला. पण म्हशीने मोठ्या साहसाने सिंहाच्या कळपाला टक्कर दिली आणि त्यांना आपल्यापासून लांब केलं. त्यानंतर म्हैस थेट पाण्यात उतरली. ज्यानंतर सिंहाचा कळप तळ्याकाठी म्हशीला पाहात उभं राहिलं आणि काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. अखेर म्हैस तळ्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचली आणि तिथून तिने पळ काढला.
हा धक्कादायक व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एलिफंट वॉक रिट्रीटचे व्यवस्थापक अँटोनी ब्रिट्झ यांनी कॅप्चर केला होता. हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कचा आहे. यावर्षी २६ मे रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला हजारो लाइक्स आणि शेअर्स होत आहेत.