नवी दिल्ली 17 जानेवारी : मगर हा जगातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. मगर एक असा शिकारी आहे, ज्याने एकदा आपली शिकार जबड्यात पकडली तर समोरच्या प्राण्याचं मगरीच्या तावडीतून निसटणं जवळपास अशक्य होऊन जातं. अशातही शिकार पाण्यात आल्यास अगदी कितीही मोठ्या प्राण्याला मगर क्षणात आपली शिकार बनवते. मात्र आता व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रस्त्यावरच्या कुत्र्यांना देत होती खायला, भरधाव थारने तरुणीला उडवलं; CCTV फूटेज व्हायरल पाण्यातील राक्षस अशी ओळख असलेल्या मगरीचीच पाण्यात शिकार झाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. खुद्द शिकारीला बळी पडलेल्या मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. समोर आलेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये दिसतं, की धोकादायक शिकारी चित्ता पाणी पिण्यासाठी तलावाच्या काठावर पोहोचला. तो पाण्यातच असताना पाण्यात लपलेल्या मगरीने त्याच्यावर हल्ला केला. पाण्यात आपण चित्त्याची सहज शिकार करू, अशा मगरीचा समज होता. पण आकाराने लहान दिसणारा चित्ता मगरीपेक्षा जास्त ताकदवान निघाला. त्याने पाण्यातच मगरीवर मात केली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे चित्त्याने त्या मोठ्या मगरीला आपल्या जबड्यात पकडून पाण्यातून बाहेर काढलं. मगरीची शिकार केल्यावर चित्ता मगरीला आपल्या जबड्यात पकडून जंगलाच्या दिशेने निघून गेल्याचे दिसतं. व्हिडिओमधील हे दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल. यानंतर मगरीला काही अंतरापर्यंत खेचल्यानंतर चित्ता पुन्हा मागे वळून पाहतो. इथे त्याची रिअॅक्शन सर्वात पाहण्यासारखी आहे. जणू काही त्याला सांगायचं आहे की मगरसुद्धा त्याला हरवू शकली नाही. इवल्याशा माकडाने फोडला वाघाला घाम; शिकारीच्या प्रयत्नात असतानाच झाली वाईट अवस्था, मजेशीर VIDEO चित्ता मगरीची शिकार करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. याला काही वेळातच हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. beautiful_new_pix नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ शेअऱ करण्यात आा आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे.