मराठी बातम्या /बातम्या /Viral /रस्त्यावरच्या कुत्र्यांना देत होती खायला, भरधाव थारने तरुणीला उडवलं; CCTV फूटेज व्हायरल

रस्त्यावरच्या कुत्र्यांना देत होती खायला, भरधाव थारने तरुणीला उडवलं; CCTV फूटेज व्हायरल

रस्त्याकडेला असलेल्या भटक्या कुत्र्यांना अन्न देत असताना समोरच्या दिशेनं वेगात आलेली थार गाडी तिला जोरदार धडक देऊन निघून जात असल्याचं या व्हिडिओत दिसतं.

रस्त्याकडेला असलेल्या भटक्या कुत्र्यांना अन्न देत असताना समोरच्या दिशेनं वेगात आलेली थार गाडी तिला जोरदार धडक देऊन निघून जात असल्याचं या व्हिडिओत दिसतं.

रस्त्याकडेला असलेल्या भटक्या कुत्र्यांना अन्न देत असताना समोरच्या दिशेनं वेगात आलेली थार गाडी तिला जोरदार धडक देऊन निघून जात असल्याचं या व्हिडिओत दिसतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    चंडिगढ, 16 जानेवारी : हिट अँड रन, रस्ते अपघात, कार अपघाताचं प्रमाण सध्या वाढत आहे. अशा अपघातांमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत आहे. तसंच गंभीर जखमींचा आकडाही खूप असतो. चंडीगडमध्ये अशाच प्रकारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक युवती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना अन्न देत असताना राँग साइडने वेगात आलेल्या थार गाडीने युवतीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर थार गाडी वेगात निघून गेली. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अपघातप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    चंडीगडमधल्या सेक्टर 53मधल्या फर्निचर मार्केटमध्ये रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तेजस्विता कौशल (वय 25) ही युवती रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना अन्न देत होती. त्या वेळी राँग साइडने वेगात आलेल्या थार गाडीने तिला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर ही गाडी वेगात निघून गेली. या भीषण अपघातात तेजस्विता गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेजस्विता आर्किटेक्चर शाखेची पदवीधर आहे. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला असून, फूटेजच्या आधारे तेजस्विताच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    हेही वाचा : Dog Wedding : कुत्रा-कुत्रीच्या लग्नात दणकून नाचले वऱ्हाडी; वरमाला,सप्तपदी, रिसेप्शन सगळंच साग्रसंगीत

    भीषण अपघातानंतर तेजस्विताचे वडिल ओजस्वी कौशल यांनी घटनेचं सीसीटीव्ही फूटेज मिळवलं आणि पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदवला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेच्या व्हिडिओवरून सेक्टर 61च्या पोलिसांनी प्रकरणाची तक्रार नोंद केली आहे. `तेजस्विता आर्किटेक्चर पदवीधारक असून, ती सध्या यूपीएससीची तयारी करत आहे. माझी पत्नी मजिंदर कौर आणि मुलगी तेजस्विता रोज रस्त्यावरच्य भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठी मार्केटमध्ये जातात,` असं ओजस्वी कौशल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

    तेजस्विता रस्त्याच्या कडेला असलेल्या भटक्या कुत्र्यांना अन्न देत असताना समोरच्या दिशेनं वेगात आलेली थार गाडी तिला जोरदार धडक देऊन निघून जात असल्याचं या व्हिडिओत दिसतं. धडक बसल्यावर ही युवती खाली कोसळल्याचं दिसतं. ही घटना घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर जीएमएसएच-16 रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तिच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला टाके घातले आहेत. `तेजस्विताची प्रकृती आता सुधारत असून, ती आता पूर्वीप्रमाणे बोलू शकत आहे,` अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.

    First published:
    top videos

      Tags: Shocking viral video