जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Chandrapur Major Accident : ओव्हरटेकचा नाद बेकार, भर चौकात टाटाच्या कारचा भयानक अपघात, LIVE VIDEO

Chandrapur Major Accident : ओव्हरटेकचा नाद बेकार, भर चौकात टाटाच्या कारचा भयानक अपघात, LIVE VIDEO

Chandrapur Major Accident : ओव्हरटेकचा नाद बेकार, भर चौकात टाटाच्या कारचा भयानक अपघात, LIVE VIDEO

चंद्रपूर शहरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव चारचाकी वरोरा नाका चौकातील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या खांबाला धडकली.

  • -MIN READ Chandrapur,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रपूर, 04 मार्च : चंद्रपूर शहरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव चारचाकी वरोरा नाका चौकातील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या खांबाला धडकली. धडक इतकी जबर होती की दुभाजकाचा काही भाग खचून रस्त्यावरच कोसळला. अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामनगर पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. या कारच्या मागून येत असलेल्या एका दुसऱ्या वाहनाच्या फ्रंट कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला.

जाहिरात

दरम्यान, महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून गाजावाजा केलेल्या समृद्धी महामार्गावर 2 भीषण अपघात झाले आहे. फतियाबाद परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रक कोसळल्यानंतर ट्रकला भीषण आग लागली आहे. या आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहेय  ट्रकमधील ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रकमध्ये किती जण होते, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

16 पेक्षा जास्त वेळा चाकूने वार, लग्नाला नकार अन् बॉयफ्रेंडने तिचा विषयच संपवला!

केमिकल ट्रक असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला अपयश आले. ट्रक अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अस्पष्ट झाला नाही.

तर नागपूरजवळ एका पिकअप व्हॅनला अपघात झाला आहे. सोलापूर येथून द्राक्षे भरून गोंदियाला जाणारी पिकअप व्हॅन आज पहाटे पाच वाजता समृद्धी महामार्गावरून खाली उतरताना झिरो पॉईंट गार्डनमध्ये घुसली. त्यात गाडीत बसलेल्या गाडी मालकाला इजा झाली तर चालकाला सुद्धा किरकोळ जखमा झाल्या. माणिक रोडगे असे जखमी गाडीमालकाचे नाव आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जाहिरात
वडिलांनी प्रेमविवाहाला दिला नकार; रागात मुलीने जन्मदात्यासोबत केलेलं कृत्य वाचूनच उडेल थरकाप

वेंगुर्ल्यातील निवती समुद्रात बोटीला आग

दरम्यान, वेंगुर्ल्यातील निवती समुद्रात नांगरून ठेवलेल्या मिनी पर्ससीन बोटीला आग लावल्याची घटना घडली आहे. मत्स्य व्यावसायिक श्याम चंद्रकांत सारंग यांच्या मालकीच्या चांदणी या मिनी पर्ससीन बोटीला समुद्रात आग लावण्यात आली. यामधे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. यात बोटीवरील तीन इंजिन, जाळी जळून खाक झाली. याबाबत नीवती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी दिपेश संजय धुरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने आपण हे कृत्य व्यावसायिक वादातून केले असल्याची कबुली दिली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात