मुंबई, 04 सप्टेंबर : चिमणी चिव चिव करते, कावळा काव काव करतो, पोपट विठू विठू करतो. प्रत्येक पक्ष्याचा आवाज (Bird voice) वेगवेगळा असतो. पण पोपटाचं बोलणं सोडलं तर कधी कोणत्या पक्ष्याला (Bird video) एखाद्या माणसाचा आवाज काढताना पाहिलं आहे का? सध्या असाच एक शॉकिंग व्हिडीओ (Shocking video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एक पक्षी चक्क बाळासारखा रडतो आहे (Bird crying like baby). पक्ष्याचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ शॉकिंग आहे. या पक्ष्याचा आवाज ऐकून आपला स्वतःच्या कानावरही विश्वास बसणार नाही.
Bet you weren't expecting this wake-up call! You're not hearing things, our resident lyrebird Echo has the AMAZING ability to replicate a variety of calls - including a baby's cry!
— Taronga Zoo (@tarongazoo) August 30, 2021
📽️ via keeper Sam #forthewild #tarongatv #animalantics pic.twitter.com/RyU4XpABos
व्हिडीओत पाहू शकता पक्षी ओरडतो आहे. पण एखाद्या पक्ष्याच्या ओरडण्यासारखा त्याचा आवाज नाही तर चक्क एका बाळाचा आवाज आहे. तो जेव्हा ओरडतो तेव्हा बाळाचा आवाज येतो. बाळाच्या रडण्याचा आवाज या पक्ष्याच्या गळ्यातून बाहेर पडतो आहे. हे वाचा - VIDEO: कोंबड्यासोबत पंगा घेणं भोवलं; तरुणाची झाली भलतीच फजिती, अक्षरशः फुटला घाम सिडनीच्या टॅरोंगा प्राणीसंग्रहालयातील Taronga zoo हे दृश्य आहे. या प्राणीसंग्रहालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. माहितीनुसार हा पक्षी lyrebird आहे. जो वेगवेगळे आवाज काढण्यात म्हणजे आवाजाची नक्कल करण्यात तरबेज असतो. या पक्षी आवाज बरोबर लक्षात ठेवतो आणि तसा हुबेहुब आवाज काढण्याचा सरावही करतो. या पक्ष्यानेही कदाचित असाच बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला असावा आणि अगदी तसाच आवाज तो काढतो आहे.