मुंबई, 18 जुलै : रस्ता अपघाताचे तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असणार पण एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. या व्हिडीओ एका कारचा आहे जी एका ट्रकच्या मागच्या भागात अडकली आहे आणि ट्रक त्या कारला असंच फरफट घेऊन जात आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक ट्रिपर लॉरी मागच्या बाजूला अडकलेल्या कारला 2 किलोमीटरपर्यंत घेऊन जाताना दिसत आहे. उडुपी जिल्ह्यातील पादुबिद्री भागाजवळ झालेल्या या अपघातात कार मागून आदळल्याने लॉरीखाली अडकली. आधी रिक्षावाल्यासोबत वाद मग महिलेला नेलं फरफटत, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये, ड्रायव्हर कारमध्ये अडकलेला दिसत आहे, त्याला बाहेर देखील पडता येत नाही आणि त्याला लॉरी पुढे खेचत आहे. या ड्रायवरला बाजूच्या गाडीमधील काही लोक थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू तो काही थांबायला तयार नव्हता. हा व्हिडीओ बाजूला असलेल्या गाडीमधील एका व्यक्तीने आपल्या कैमेरात कैद केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना दर्शन देवया नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘एका विचित्र घटनेत, सोमवारी, 17 जुलै रोजी दुपारी, उडपी जिल्ह्यातील पादुबिद्री पोलिस हद्दीत एका टिप्पर ट्रकच्या चालकाने ट्रकच्या खाली चेसि अडकलेली कार ओढली. काही किलोमीटर ती ड्रॅग देखील करत राहिला." मिळालेल्या माहितीनुसार, सॅन्ट्रो कार सागरहून मंगळुरूकडे जात होती. ही लॉरी बेलमनहून बेगमपेठेच्या दिशेने जात होती. तेव्हा मागून गाडी येऊन ट्रकला आदळली. गाडी मागे अडकल्याचे आपल्या लक्षात आले नाही, असे लॉरीच्या चालकाने पोलिसांना सांगितले.
WATCH: In a bizarre incident, the driver of a tipper truck drove the vehicle for about 2 kms dragging a car that got stuck beneath truck’s chassis after rear-ending it in Padubidri police limits of Udupi district on July 17, Monday afternoon. pic.twitter.com/eUv2XYuHS8
— Darshan Devaiah B P (@DarshanDevaiahB) July 17, 2023
एका कारने त्याच्या लॉरीला धडक दिल्याचे माहीत असतानाही इतर लोकांपासून वाचण्यासाठी त्याने आपल्या ट्रकचा वेग वाढवला. दरम्यान, स्थानिक लोकांनी या लॉरीचा पाठलाग करून वाहन थांबवले. त्यानंतर त्यांनी पडुबिद्री पोलिसांना माहिती दिली, त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चालकाला अटक केली. या अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी जफर खान आणि शाहिना या दोघांना सुरतकलजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.