मुंबई 07 जून : दक्षिण भारतातील सुपरहिट चित्रपट KGF चे डायलॉग तुम्ही पाहिलेच असतील. त्यात रॉकीचा म्हणजेच अभिनेता यशचा एक डायलॉग होता - ‘दुनिया का सबसे बड़ा योद्धा मां होती है!’ हा डायलॉग ज्या सीनमध्ये बोलला गेला तो खूप भावुक होता. पण हे वाक्य फक्त माणसांबाबतच खरं आहे असं नाही, कारण प्रत्यक्षात ते प्राणीजगतातही अर्थपूर्ण आहे. जेव्हा प्राणी आपल्या मुलाला धोक्यात पाहतात तेव्हा तेदेखील सर्वात मोठ्या आव्हानांचा सामना करतात. आपल्या पिल्लांच्या जीवाला धोका असताना एका मांजरीनेदेखील असंच केलं. मांजरीने स्वतःहून आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्याला असा धडा शिकवला की तो इथून पुढे तिच्या पिल्लांना कधीही त्रास देणार नाही. @Figensport या ट्विटर अकाउंटवर अनेकदा विचित्र व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे , ज्यामध्ये कुत्रा आणि मांजर यांच्यातील भांडण दिसत आहे. VIRAL VIDEO - तलावातील मगरींच्या कळपात व्यक्तीने फेकलं मांस, एक मगर मात्र पाण्याबाहेरच आली अन्… ही लढत अतिशय वेगळी आहे, कारण यात लहान आणि कमकुवत जीव जिंकतो, कारण ती आई आहे! आम्ही इथे कोणत्याही चित्रपटाबद्दल बोलत नाही, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गोष्ट समजेल. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा लहान मांजरीचं पिल्लू तोंडाने पकडतो आणि त्याच्याकडे बघून असं जाणवतं की तो या पिल्लाचा जीव घेईल. पण तेवढ्यात त्या पिल्लाची आई म्हणजेच मांजर तिथं धावत येते. ती आधी पिल्लाला वाचवते आणि मग कुत्र्यावर हल्ला करते. ती कुत्र्याच्या तोंडावर वार करते. काही वेळासाठी असं वाटतं जणू ती आता या कुत्र्याचा जीवच घेईल. त्या मांजरीच्या भीतीने कुत्रा मागे हटू लागतो. पण मांजर त्याच्या चेहऱ्याकडे उडी मारते आणि त्याला चावते. त्यानंतर ती तिथून पिल्लांसह पळून जाते.
हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याला 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने विचारलं की कुत्र्याच्या मालकाने हस्तक्षेप करून मांजरीचे प्राण का वाचवले नाही? एकाने म्हटलं, की मादी मांजरीने कुत्र्याला सांगितलं, की पिल्लांचा जीव धोक्यात असल्याचं पाहून तिची काय अवस्था होते.