Home /News /viral /

अस्वलाची छाती पाहूनच घाबरला वाघ, लढण्याआधीच पत्करली शरणागती; VIDEO VIRAL

अस्वलाची छाती पाहूनच घाबरला वाघ, लढण्याआधीच पत्करली शरणागती; VIDEO VIRAL

अस्वलाला पाहून वाघ झालं भित्रं मांजर.

    भोपाळ, 15 ऑक्टोबर : वाघ (Tiger) ज्याने डरकाळी फोडताच सर्वजण गार पडतात. माणसंच नाही तर किती तरी प्राणीही (Animal video) वाघाला  (Tiger video) घाबरतात. अशा या वाघाला मात्र अस्वल (Bear video) बिनधास्तपणे सामोरा गेला आहे. कटाक्ष नजरेने पाहणाऱ्या वाघासमोर अस्वल छाती ताणून उभा राहिला (Tiger and bear video). अस्वालाची छाती पाहूनच वाघ घाबरला (Tiger fear bear). अस्वलाला पाहून वाघाचं भित्रं मांजर झालं आणि त्याने लढण्याआधीच शरणागती पत्करली. वाघ आणि अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोघंही एकमेकांसमोर आले तर कोण बाजी मारेल असं विचारलं तर साहजिकच आपण वाघ म्हणू. पण या व्हिडीओत मात्र उलटचं घडतं आहे. अस्वल वाघासमोर उभा राहिला आणि भीतीने वाघ त्याच्यासमोर झुकला. व्हिडीओत पाहू शकता अस्वलाला पाहून वाघ थोडावेळ थांबला. अस्वलाकडे तो एकटक पाहत राहिला. जणूकाही याची शिकार करू की नको, असाच विचार तो करत असावा. पण वाघाला एकटक आपल्याकडे पाहताना पाहून अस्वलाची सटकली. तो कसा वाघाला घाबरतो उलट तो छाती काढून वाघासमोर उभा राहिला आणि मग काय शिकार करण दूर. वाघाने लढण्याआधीच हार मानली. अस्वलासमोर तो झुकला. त्याच्यासमोर गप्पपणे जमिनीवर शेपटी हलवत तो बसला. हे वाचा - अस्वलाची शिकार करायला गेला, पण वाघाने स्वतःच भीतीने ठोकली धूम; नेमकं काय घडलं पाहा VIDEO मध्य प्रदेशच्या बालाघाटमधील हे दृश्य आहे. कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघ आणि अस्वल आमनेसामने आले. तेव्हा जे घडलं ते तिथल्या पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत इतर प्राण्यांना घाबरणारा वाघ तुम्ही पाहिला असेल. पण स्वतःच घाबरलेला वाघ कदाचित पहिल्यांदाच पाहिला असावा. असे व्हिडीओ म्हणजे दुर्मिळच असतात. त्यामुळे ते क्वचितच पाहायला मिळतात. हे वाचा - स्वतःच्या हाताने भरवणाऱ्या महिलेलाच माशाने पाण्यात खेचलं आणि...; खतरनाक VIDEO याआधीसुद्धा राजस्थानच्या रणथंभौर अभयारण्यातील (Ranthambore National Park) एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.  या व्हिडीओमध्ये अस्वल वाघाला घाबरवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता वाघ सुस्त अस्वलावर हल्ला करायला जातो. तेव्हा अस्वलच त्याचा पाठलाग करतो आणि वाघ धूम ठोकतो. दोन दोन वाघांचा सामना करण्यासाठी अस्वल उभा राहतो. जेव्हा वाघांना वाटतं की अस्वल त्याच्यावर हल्ला करू शकतो तेव्हा ते शांतपणे तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंतर अस्वल त्याचा पाठलाग सुरू करतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Tiger, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या