नवी दिल्ली, 5 मे : बिबट्या (Leopard) आणि सिंह (Lion) दोघेही शिकारी, हिंस्त्र प्राणी आहेत. भल्यामोठ्या प्राण्याचीही सिंह, बिबट्या एका झडपेत शिकार करतात. परंतु अनेकदा हे दोघे थेट एकमेकांनाच भिडल्याचं समोर आलं आहे. दोघांच्या या लढाईत कोण जिंकणार, याचा अंदाज लावणं कठीणचं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका सिंहाने, सर्वात चपळ असणाऱ्या बिबट्यावरच हल्ला केला आहे.
या व्हिडीओमध्ये एका जंगलात तीन बिबटे फिरताना दिसतात. तिथेच काही अंतरावर सिंह देखील फिरताना दिसतात. बिबट्या आणि सिंह दोघेही शिकारीच्या शोधात असल्याचं दिसतंय. त्याचवेळी सिंहाची नजर बिबट्यावर पडते. सिंह आपल्याकडेच येत असल्याची चाहूल लागताच बिबट्या तेथून पळू लागतो.
काही अंतरावर जाऊन सिंह बिबट्याला गाठतोच आणि त्याला आपल्या जबड्यात पकडतो. सिंहाने बिबट्यावर केलेला हल्ला इतका जोरदार होता, की त्याने आजूबाजूला धूळ उडू लागते. सिंहाच्या तावडीतून सुटण्यासाठी बिबट्या अनेक प्रयत्न करतो. पण सिंहाने त्याला जमिनीवर पाडून, आपल्या तावडीत घेतलेलं असतं.
सिंह बिबट्याला आपल्या तावडीत पकडून, बिबट्याच्या चेहऱ्यावर हल्ला करू लागतो. त्यादरम्यान दुसरा सिंहदेखील येतो आणि तोही बिबट्यावर हल्ला करुन त्याला फाडण्याचा प्रयत्न करू लागतो. दोघेही बिबट्यावर तुटून पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
हा व्हिडीओ वॉल्फ चॅनेल नावाच्या एका यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 93 लाख 38 हजारहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.