चेन्नई 09 जानेवारी : चेन्नईत रविवारी राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिपदरम्यान एक वेदनादायक अपघात झाला. या अपघातात प्रसिद्ध रेसर केई कुमार यांचा मृत्यू झाला. केई कुमार हे 59 वर्षांचे होते. अपघातानंतर रेस दिवसभरासाठी पुढे ढकलण्यात आली. केई कुमार हे मद्रास मोटर्स स्पोर्ट्स क्लब (MMSC) चे आजीवन सदस्य होते. ही रेसिंग स्पर्धा मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे होत होती. अंजली गाडीखाली अडकल्याचं माहिती होतं? कंझावाला प्रकरणात आरोपींचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा शर्यतीदरम्यान कुमार यांची कार स्पर्धकाच्या कारला धडकल्याने सकाळी हा अपघात झाला. या धडकेमुळे केई कुमार यांची कार ट्रॅकवरुन घसरली आणि कुंपणाला आदळून जमिनीवर पडली. लाल झेंडा दाखवून शर्यत तात्काळ थांबवण्यात आली. यानंतर काही मिनिटांत केई कुमार यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर घाईघाईत ट्रॅकच्या वैद्यकीय केंद्रात प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचं प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आलं नाही. केई कुमार यांच्या निधनाबद्दल शर्यतीच्या आयोजकांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या रेस मीटचे अध्यक्ष विक्की चंडोक म्हणाले, ‘ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कुमार हा अनुभवी रेसर होता. मी त्याला अनेक दशकांपासून एक मित्र आणि प्रतिस्पर्धी म्हणून ओळखतो. त्यांच्या निधनाने MMSC शोक करत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. चंडोक म्हणाले की, खेळांचे प्रशासकीय मंडळ FMSCI आणि आयोजक MMSC यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.