• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पाहता पाहता नदीत बुडाली माणसांनी भरलेली बोट, थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

पाहता पाहता नदीत बुडाली माणसांनी भरलेली बोट, थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

नदीकाठी पोहचणार तेवढ्यातच बुडाली माणसांनी भरलेली बोट. सुदैवानं बोटीत असलेल्या लोकांचा वाचवण्यात यश.

 • Share this:
  कटिहार, 07 जुलै : अतिवृष्टीमुळे बिहारमधील बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. त्याचबरोबर नद्यांच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम केले जात आहे. मात्र याचदरम्यान एक मोठा अपघात होता होता राहिला. माणसांनी भरलेली बोट नदीत पलटली, मात्र सुदैवानं यात कोणालाही इजा झाली आहे. नदीच्या काठाजवळ पोहचत असतानाच अचानक बोट बुडाल्यानं तारांबळ उडाली. दरम्यान, लगेचच स्थानिकांनी लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. कडवा पोलीस स्टेशन परिसरातील जाजा पंचायत येथील नंदनपूर घाटात झालेल्या या अपघाताच्या व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एकाच बोटीत खूप सारे लोकं बसले असल्याचे दिसत आहे. सुदैवाने बोट किनाऱ्यापर्यंत पोहचल्यानंतर हा अपघात झाला. या बोटीत 20 जण असल्याची माहिती मिळाली आहे. बोटीतील सर्वांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे. वाचा-भर पावसात सुरू होते पोल दुरुस्तीचे काम,वायरमॅनचा अचानक गेला तोल आणि..,पाहा VIDEO असे सांगितले जात आहे की केलबारी गावचे लोक नावेतून महानंदा नदीच्या नंदनपूर घाटात पोहोचले होते. बोटमध्ये जास्त लोकं असल्यामुळं बोट बुडाली. घाटाजवळ आणि शेजारी असलेल्या लोकांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. वाचा-लग्नापेक्षा काम महत्त्वाचं! सप्तपदी सोडून मंडपातच लॅपटॉपवर काम करायला लागली वधू वाचा-लॉकडाऊनमध्ये तेलात चिप्स तळत असताना अचानक आला विषारी धूर आणि... संपादन-प्रियांका गावडे.
  Published by:Manoj Khandekar
  First published: