लॉकडाऊनच्या काळात होम डिलिव्हरी सुरू असल्याने झोमॅटो, स्वीगी सारख्या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय मात्र या महासाथीत काम करीत होते. आतापर्यंत त्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहे. मात्र हा व्हिडीओ खास आहे. लॉकडाऊनमध्ये एखाद्या खाद्यपदार्थाची ऑर्डर केल्यानंतर झोमॅटो आणि स्वीगीचे डिलिव्हरी बॉय आपल्या टू व्हिलरवरुन पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचवतात. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना घराबाहेर पडण्यास बंदी असताना हे डिलिव्हरी बॉय रस्त्यावरून फिरताना दिसत होते आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवित होते. दरम्यान या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा (Swiggy Delivery Boy viral video) एक व्हिडीओ समोर आला आहे. खाद्यांवर पदार्थांची बॅग घेतलेला हा तरूण बाईक किंवा स्कूटर नाही तर चक्क स्केटिंग करीत ऑर्डर ग्राहकांपर्यंत पोहोचवित आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा-हात आहे की हातोडा! फक्त कोपराने एका मिनिटात धडाधड फोडले 279 अक्रोड; पाहा VIDEO
अनेकांनी तर पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे भावावर ही वेळ आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत या व्हिडीओ 50 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर वाचक भरभरून प्रतिक्रियाही देत आहे. स्केटिंग करताना हा तरुण घडाळ्याकडे बघतो आणि त्यानंतर गती वाढवतो. अनेकांनी या तरुणाचं कौतुक केलं आहे. अनेकदा ऑर्डर उशिरा पोहोचल्यावर आपण डिलिव्हरी बॉयवर चिडतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात जिथे कोरोनाची भीती आहे, अशा परिस्थितीतही हे डिलिव्हरी बॉय आपलं काम नित्यनेमाने करीत आहेत.
हे ही वाचा-Explainer: तुमच्या खिशालाही बसतेय जागतिक इंधनवाढीची झळ? समजून घ्या
देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. याचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला आहे. सोमवारी (पाच जुलै) दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 99.86 रुपये आणि डिझेलचा दर 89.36 रुपये प्रति लिटर एवढा झाला. मुंबईत हे दर अनुक्रमे 105.92 आणि 96.91 रुपये असे आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol and diesel price, Swiggy, Viral video on social media