मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हात आहे की हातोडा! फक्त कोपराने एका मिनिटात धडाधड फोडले 279 अक्रोड; पाहा थक्क करणारा VIDEO

हात आहे की हातोडा! फक्त कोपराने एका मिनिटात धडाधड फोडले 279 अक्रोड; पाहा थक्क करणारा VIDEO

हाताने कमीत कमी वेळेत सर्वाधिक अक्रोड फोडण्याचा विश्वविक्रम या भारतीय तरुणाने केला आहे.

हाताने कमीत कमी वेळेत सर्वाधिक अक्रोड फोडण्याचा विश्वविक्रम या भारतीय तरुणाने केला आहे.

हाताने कमीत कमी वेळेत सर्वाधिक अक्रोड फोडण्याचा विश्वविक्रम या भारतीय तरुणाने केला आहे.

मुंबई, 05 जुलै : अक्रोड (Walnut) किती कडक असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे. अगदी हातोड्याने जरी फोडायला गेलात तरी एका मिनिटांत तुम्ही फार फार तर किती अक्रोड फोडू शकता, अगदी बोटावर मोजता येतील इतकेच. पण एका व्यक्तीने मात्र एका मिनिटांत तब्बल 269 अक्रोड फोडले (Most Walnuts Crushed) आहेत. तेसुद्धा हातोड्याने नाहीत तर स्वतःच्या हाताच्या कोपराने.

सुजीत कुमार याने आपल्या कोपराने अक्रोड फोडण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याने एका मिनिटात 279 अक्रोड फोडेल आहेत. ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. एका मिनिटात सर्वाधिक अक्रोड फोडण्याचा त्याने रेकॉर्ड केला आहे.

guinnessworldrecords  च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हे वाचा - अरे बापरे! फुलांवर पाणी शिंपडताच जमिनीतून बाहेर पडल्या दारूच्या बाटल्या

व्हिडीओत पाहू शकता. ही सुजीत कुमार कशा पद्धतीने आपल्या कोपराने अक्रोड फोडतो आहे. ते पाहून आपल्यालाही धडकीच भरते. एका भारतीयाने ही कमाल करून दाखवली आहे, त्यामुळे प्रत्येकाला सुजीत कुमारचा अभिमान वाटतो आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण त्याचं कौतुक करतं आहे. अनेकांनी आपल्या वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos, World record