मुंबई, 22 एप्रिल : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे की चक्क जगभरातून अनेक मुलींनी त्यावर कमेंट करत जस्टिन यांच्याबरोबर फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान असणारे जस्टिन ट्रुडो कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबतची परिस्थिती मीडियाच्या माध्यमातून देत होते. त्यावेळी त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (हे वाचा- डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला धमकी, कोरोना पसरवण्यात हात असेल तर.. ) कोरोनाबाबत माहिती देताना नव्हे तर त्यांची केस नीट करण्याची स्टाइल बघून अनेकजण फिदा झाले आहेत. पंतप्रधान जस्टीन सध्या घरूनच काम करत आहेत. अशावेळी ते घरातूनच पत्रकारांना संबोधित करतात. नुकतेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी छोट्या व्यवसायांना आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली होती. दरम्यान पत्रकारांना संबोधित करतेवेळी जोरदार हवा सुरू झाली आणि त्यामुळे त्यांचे केस काहीसे विस्कटले. त्यावेळी जस्टीन यांनी एखाद्या हिरोप्रमाणे त्यांचे केस मागे घेतले. मीडिया ब्रिफिंग केल्याच्या व्हिडीओमधील एवढाच एक भाग स्लो मोशनमध्ये एडीट करून व्हायरल करण्यात आला आहे. ज्यामध्ये छानसे म्युझिक देखील जोडण्यात आले आहे. या व्हिडीओला जगभरातील अनेकांनी पसंती दाखवली आहे.
फेसबुकवर हा व्हिडीओ आतापर्यंत 5 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर देखील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
Are we just gonna ignore Justin Trudeau's hair flip moment? Duh. https://t.co/6MJr6LGiDT
— Al Rad (@alradomes) April 20, 2020
कॅनडा व्यतिरिक्त ज्या इतर देशातील सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट केली आहे, त्यापैकी बऱ्याच जणांनी आमच्या देशाचे पंतप्रधान असे का नाहीत अशी तक्रार केली आहे. काहींनी त्यांना जगभरातील सर्वात हॉट राजकीय नेता असं देखील म्हटलं आहे. संपादन - जान्हवी भाटकर