जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Brain Game : हुशार असाल तर कैदीला जेलमधून पाळून जाण्यासाठी मदत करा, पाहा तुम्हाला जमतंय का?

Brain Game : हुशार असाल तर कैदीला जेलमधून पाळून जाण्यासाठी मदत करा, पाहा तुम्हाला जमतंय का?

सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

आज आम्ही असंच एक कोडं तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ज्यात दिलेले कोडे अतिशय मनोरंजक आणि अतिशय अवघड आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै : ऑप्टिकल इल्यूजन हे फसवे फोटो असतात ते आपल्या डोळ्यांना फसवतात. ते अशाप्रकारे आपल्या डोळ्यांसमोर भास तयार करतात की तुम्हाला पहिल्.या नजरेत त्यात काय वेगळं आहे हे कळतच नाही. या प्रकारचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे सोडवणं लोकांना फार आवडतं. या शिवाय सोशल मीडियावर अनेक कोडी देखील विचारली जातात जी आपल्या मेंदूला खूप विचार करायला लावतात. आज आम्ही असंच एक कोडं तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ज्यात दिलेले कोडे अतिशय मनोरंजक आणि अतिशय अवघड आहे. Optical Illusion : दोन समान चित्रांमध्ये 3 फरक शोधण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार का? त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फोटो पाहावा लागेल. या फोटोत एक कैदी आहे आणि त्याच्यासमोर तीन दरवाजे आहेत. पण यापैकी कोणच्या दरवाजातून पाळावं हे कैदीला करत नाही. आता त्याला इथून पळून जाण्यासाठी तुम्हाला मदत करायची आहे.

News18

तुम्ही जर पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की त्या कैद्यापुढे तीन रस्ते आहेत. एका दरवाज्याजवळ भुकेले कुत्रे उभे आहेत. तर दुसऱ्यामध्ये टाईम बॉम्ब ठेवण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या दरवाजात एक गार्ड बंदूक घेऊन उभा आहे. आता सांगा चोर कुठल्या वाटेने पळेल? या प्रश्नाचं उत्तर तसं सोप्पं आहे, परंतू सहजासहजी ते लक्षात येणं शक्य नाही. ऑप्टिकल इल्युजन फोटोत लपलाय पक्षी, हुशार असाल तर 10 सेकंदात शोधून दाखवा चला मग उत्तर सांगा… आशा आहे की तुम्ही हे कोडे सोडवले असेल. जर तुम्हाला अजूनही या कोड्याला सोडवता आलं नसेल तरी काळजी करण्याची गरज नाही आम्ही तुम्हाला ते सोडवण्यासाठी मदत करु. कैद्यासाठी पळून जाण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे दुसरा दरवाजा. ज्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवला आहे. कारण तो बॉम्ब पुढील 5 किंवा 10 मिनिटांत फुटेल, तोपर्यंत कैदी तुरुंगातून पळून कुठेतरी निघून जाऊ शकतो. बरं या कोड्याला गंमतीनं घ्या, खरंच कैद्याला पळून जाण्यासाठी मदत करणं हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात असा साहस नकोच.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात