जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ऑप्टिकल इल्युजन फोटोत लपलाय पक्षी, हुशार असाल तर 10 सेकंदात शोधून दाखवा

ऑप्टिकल इल्युजन फोटोत लपलाय पक्षी, हुशार असाल तर 10 सेकंदात शोधून दाखवा

सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

ऑप्टिकल इल्युजन लोकांना गोंधळात टाकतात, परंतु लोक त्यांच्यात लपलेले कोडे सोडवण्यात आनंद घेतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 जुलै : सोशल मीडियावर अनेकदा ऑप्टिकल इल्युजन फोटो किंवा व्हिडीओ समोर येतात. या ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये लपलेले कोडे सोडवल्याने माणसाचा दिवसभराचा थकवा दूर होतो आणि मन ताजेतवाने होतं, ज्यामुळे लोक अशी कोडी सोडवतात. यामुळे रोजरोज तेचतेच काम करुन कंटाळलेल्या मेंदूला देखील चालना मिळते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक ऑप्टिकल इल्युजन फोटो घेऊन आलो आहोत ज्यामध्ये एक पक्षी लपलेला आहे आणि तुम्हाला तो पक्षी शोधून काढायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट वेळ दिली जाईल, त्या वेळेत हे पूर्ण केलंत तर तुम्ही खूपच हुशार आहात म्हणून समजा. ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये लपलेल्या गोष्टी प्रत्येकाला सापडत नाहीत. आता बघू या चित्रातला पक्षी 10 सेकंदात सापडतो का? सोर्स : सोशल मीडिया

    सोर्स : सोशल मीडिया

    ऑप्टिकल इल्युजन लोकांना गोंधळात टाकतात, परंतु लोक त्यांच्यात लपलेले कोडे सोडवण्यात आनंद घेतात. हे चित्र मेंदूच्या व्यायामासाठी चांगले आहेत. यापैकी काही फोटोंमध्ये कोडी सोडवायची असतात, तर काही चित्रे व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून समोर येतात. ऑप्टिकल इल्युजनमध्ये, गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात, परंतु तरीही असा काही भ्रम तयार होतो की त्या गोष्टी आपल्याला सहजासहजी दिसत नाही. कधी कधी फोटो नुसते बघून समजणे फार कठीण असते. असे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात, ज्यामधून लोकांना खूप प्रयत्न करूनही लपवलेल्या गोष्टी सापडत नाहीत. या चित्रात पक्षी इतका हुशारीने लपला आहे की त्याला एका दृष्टीक्षेपात शोधणे अत्यंत कठीण होईल. यामुळे, दिलेल्या वेळेच्या मर्यादेत हे ऑप्टिकल भ्रम सोडवणे फार कमी लोकांना शक्य झाले आहे. पाहा तुम्हाला ते जमतय का? तुम्हाला पक्षी दिसला नाही तरी काळजी करण्याची गरज नाही. आम्ही त्याला शोधण्यासाठी तुमची मदत करु. पाहा इथे लपलाय पक्षी… सोर्स : सोशल मीडिया

    सोर्स : सोशल मीडिया

    आता तरी हा पक्षी नक्कीच दिसला असेल, मग आता हे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहा त्यांना तरी हे शोधणं जमतंय का.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात