Home /News /viral /

VIDEO - आपल्या इवल्याशा तोंडात त्याचा जबडा धरला आणि...; एवढ्याशा बेडकाने श्वानाचे केले हाल

VIDEO - आपल्या इवल्याशा तोंडात त्याचा जबडा धरला आणि...; एवढ्याशा बेडकाने श्वानाचे केले हाल

बेडुक आणि कुत्र्याच्या लढाईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 01 मार्च : माणूस असो वा प्राणी तो ताकदवान असेल सामान्यपणे तो कमजोर असलेल्यावर भारी पडतो. पण प्रत्येक वेळी असंच असतं असं नाही. तुम्हाला विश्वासही बसणार नाही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये चक्क एक छोटंसं बेडुक श्वानावर भारी पडलं आहे. एरवी सर्वांना चावा घेणाऱ्या श्वानालाच एका बेडकाने करकचून चावा घेतला आहे. बेडुक आणि कुत्र्याच्या लढाईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  एक छोटासा बेडुक भल्यामोठ्या श्वानाला सामोरा गेला आहे. आपण माणसंही बऱ्यादा कुत्र्यांना पाहून घाबरतो पण एवढ्याशा बेडकाने मात्र जे केलं ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. त्याने मोठ्या हिमतीने श्वानाचा सामना केला. हे वाचा - 2 वाघिणींच्या लढाईत बिबट्या लटकला; मध्यस्थी करायला जाताच...; पुढे काय घडलं पाहा आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. बेडकाने कुत्र्याचं शोषण केलं, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओत पाहू शकता एक बेडुक कुत्र्यावर हल्ला करताना दिसतो आहे. टुणटुण उड्या मारत तो कुत्र्याला त्रास देतो. कुत्रा त्या बेडकाला आपल्या जबड्यात धरणार तोच बेडुक आपल्या तोंडाच त्याचा जबडा धरतो आणि करकचून चावा घेतो. हे वाचा - Yuck! उंटाजवळ जात व्यक्तीचं किळसवाणं कृत्य; VIDEO पाहूनच उलटी येईल श्वानाला वाटलं तर तो काहीही करू शकला असता पण इवल्याशा बेडकाला पाहून तो शांत बसतो. पण बेडुक मात्र श्वानाची कमजोरी समजून त्याला त्रास देत राहतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Dog, Other animal, Viral, Viral videos

    पुढील बातम्या