सोशल मीडिया हे अनेकांसाठी मनोरंजनाचं माध्यम आहे. काहीजण कंटाळा आला, की आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अपडेट शेअर करतात. अनेक जण ऑनलाइन गेम्स खेळताना दिसतात. हल्ली सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे रंजक खेळ चांगलेच चर्चेत आहेत. दृष्टिभ्रमाचे हे खेळ बुद्धीला चालना देतात. तसंच संयमाचीही परीक्षा पाहतात. शांत मानसिकतेच्या व्यक्तींनाच ही कोडी सोडवणं शक्य होतं. कोडी सोडवणं ज्याना आवडतं अशांना हे दृष्टिभ्रमाचे खेळ आवडतात. या खेळात मेंदू वेगाने चालवावा लागतो. सध्या असाच एक कोडं खूप व्हायरल झालंय. त्याबद्दलचं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रातून लपलेल्या गोष्टी शोधून काढणं म्हणजे मेंदूला व्यायामच असतो. निष्णात नेटिझन्सही कधीकधी या कामात मेटाकुटीला येतात. हे चित्र नक्की कसलं आहे हे जाणून घेऊ या. हे चित्रदेखील अशा प्रकारे काढलेलं आहे, की यातून कुठलीही गोष्ट शोधून काढणं अवघड आहे. पाल कुठे आहे ते शोधा - ऑप्टिकल इल्युजनचं कोडं म्हणून देण्यात आलेलं हे चित्र नक्कीच सुंदर आहे. या चित्रातून पाल शोधून काढायची आहे. केवळ जिनियसच हे काम करू शकतील. या चित्रातून पाल शोधून काढण्यासाठी नीट लक्षपूर्वक हे चित्र पाहणं आवश्यक आहे. अगदी वरपासून खालपर्यंत आणि डावीकडून उजवीकडे असं बारकाईने पाहायला हवं. नीट लक्ष दिल्यास आणि मन एकाग्र केल्यास यातून पाल शोधणं सोपं आहे. अर्थात, मेंदूला थोडासा ताण द्यायला हवा. तरीही पाल दिसली नाही तर आम्ही तुम्हाला क्लू देऊच. हेही वाचा - माणूस आहे की एलियन? चेहरा हटके दिसण्यासाठी महिलेने खर्च केले लाखो रुपये हे चित्र एक बागेचं आहे. यात तुम्हाला खूप झाडं, पानं, वेली, बसण्यासाठी बेंच असं सगळं दिसेल. तसंच यात एक लॅम्प पोस्टही आहे. अशा या चित्रात चित्रकाराने पाल लपवली आहे. त्या पालीला तुम्हाला शोधून काढायचं आहे. हे नवीन व्यक्तीसाठी आव्हानात्मक आहे. कारण हे काम 15 सेकंदांत करणं अपेक्षित आहे. क्लू - खाली दिलेलं चित्र नीट पहा. चित्रात डाव्या बाजूला एक झाड आहे. त्या झाडाच्या फांदीकडे नीट निरखून पाहा. कदाचित, तुमच्यातल्या जीनियस व्यक्तींना उत्तर सापडलं असणार यात शंका नाही. ज्यांना उत्तर सापडलं नाहीये, त्यांनी त्या फांदीवर पांढऱ्या रंगाचं वर्तुळ पाहा, तिकडेच तुम्हाला उत्तर मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.