काही माणसं आपले छंद आणि आवडीसाठी हजारो रुपये खर्च करतात. यामुळे मनाला काहीसा दिलासा मिळतो पण यातून ज्या काही गोष्टी निष्पन्न होतात त्या सुखावह असतातच असं नाही. आपला चेहरा आकर्षक, सुंदर दिसावा असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यासाठी अनेक महिला सौंदर्यप्रसाधनं, ब्युटी ट्रीटमेंटवर भरपूर पैसे खर्च करतात. सध्या अमेरिकेतली अशीच एक महिला जोरदार चर्चेत आहे. या महिलेने सुंदर आणि हटके दिसण्यासाठी स्वतःच्या चेहऱ्यावर अनेक प्रयोग केले आहेत; मात्र यातून तिला समाधान मिळलं असलं तरी समोरच्या व्यक्तीला तिच्याकडे पाहिल्यावर विचित्र वाटतं. सुंदर आणि आकर्षक दिसण्याच्या नादात या महिलेनं लाखो रुपये खर्च करून चेहऱ्यात खूप विचित्र बदल केले आहेत. त्यामुळे जगभरात या महिलेची चर्चा आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जगात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्या सुंदर दिसण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणं हा त्यांचा छंद असतो; मात्र यामुळे त्यांचा चेहरा समोरच्या व्यक्तीला विद्रूप वाटू शकतो. एका महिलेच्या बाबतीत काहीसा असाच प्रकार घडला आहे. या महिलेनं आपला चेहरा आकर्षक आणि विचित्र दिसावा यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. 26 वर्षांची जेसी अमेरिकेत कान्ससमध्ये राहते. जेसीने तिच्या चेहऱ्यावर अनेक प्रयोग केले आहेत. हेही वाचा - Baby Elephant मालकावर झोपला आणि… हा Video जितका क्यूट तितकाच धोकादायक जेसी 14 वर्षांची होती, तेव्हा तिला बॉडी मॉडिफिकेशनचा छंद जडला. तेव्हा तिनं स्वतःच स्वतःचे कान टोचले होते. त्यानंतर आतापर्यंत तिनं तिच्या चेहऱ्यावर इतके प्रयोग केले आहेत, की आता ती एखाद्या एलियनप्रमाणे दिसते. `डेली स्टार`ने दिलेल्या वृत्तानुसार, जेसीने आपल्या कानाच्या पाळ्या (अर्थात इअरलोब) 80 मिलीमीटरपर्यंत लांब केल्या आहेत. तिनं कानाची रचना अशी केली आहे, की तिने कानात मोठ्या इअर-रिंग्ज घातल्या आहेत असं पाहणाऱ्यांना वाटतं. तिने तिच्या विचित्र मेकअपसाठी आठ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. सर्वांत विचित्र गोष्ट म्हणजे तिने तिच्या डोक्यावर शिंगं बसवून घेतली आहेत. तिची शिंगं पौराणिक कथांमधल्या राक्षसांसारखी उगवलेली नसली तरी तिच्या डोक्यावर पुढेपर्यंत आली आहेत. त्यामुळे तिचा चेहरा अधिकच विचित्र दिसत आहे. एकूणच जेसीच्या या हटके लूकमुळे ती सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. जेसीकडे पाहिल्यावर ती एलियन असल्यासारखी वाटते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.