मुंबई, 31 डिसेंबर: आपण एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण गळाभेट घेतो मात्र हे प्रेम प्राण्यांना व्यक्त करायचं असेल तर आपापल्या परिनं करत असतात. सोशल मीडियावर उंटानं आपल्या मालकाप्रती व्यक्त केलेल्या प्रेमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सरत्या वर्षात आपल्या आयुष्यात कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणारा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर एकदा जरूर पाहा. या व्हिडिओमध्ये उंट आपल्या मालका जवळ घेऊन घट्ट मिठी मारली आहे. उंट मालकाला सोडण्यास तयार नाही. उंट आणि मालकाचं हे प्रेमळ नातील एक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्विस ऑफिसर सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. पेराल तसं उगवेल आणि तुम्ही जसं दुसऱ्याला द्याल तसंच तुम्हाला मिळेल असं नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे. उंटाचा मालक काही दिवसांपासून बेपत्ता होते. जेव्हा ते पुन्हा आपल्या घरी आले तेव्हा उंटाने त्यांना जवळ घेऊन मिठी मारली आणि त्याचे डोळे पाणावले. उंटाचं आपल्याप्रती असलेलं प्रेम पाहून मालकाचं उर भरून आलं. हेही वाचा- बाबो काय हे! चहामध्ये बुडवून खाल्ली इडली, VIDEO VIRAL
हेही वाचा- चेकपाॉईंटवर थांबवलेली बाईक आवडली ना राव! पोलिसांनी या BMWसोबत काय केलं पाहा हा व्हिडिओ फक्त सुंदरच नाही तर हृदयाला भिडणारा आहे. काळजाचा ठाव घेणारा आहे. आपण त्यांच्यावर केलेल्या प्रेमाची त्यांना उत्तम जाण असते. हा व्हिडिओ नंदा यांनी 27 डिसेंबर रोजी शेअर केला होता. 22 हजारहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहण्यात आला आहे. 300 हून अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. आतापर्यंत आपण कुत्रा, ससा, मांजराचं मालकावर असणारं आपर प्रेम पाहिलं होतं. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असतात. मात्र घोडा आणि उंटाचं असं आपल्या मालकाला प्रेमानं बिलगलेलं दृश्य फार क्वचित पाहायला मिळतं. माणसांपेक्षाही अधिक प्रेम करणाऱ्या या मुक्या प्राण्याचा 2019 च्या सरत्या वर्षातला हृदयाचा ठाव घेणार हा व्हिडिओ एकदा तरी नक्कीच पाहायला हवा.