कॅलिफोर्निया, 20 ऑगस्ट : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील जंगलात भीषण आग लागली आहे. यामुळे हजारो लोकांना आपलं घरे सोडून जावे लागले आहे. कॅलिफोर्नियामध्ये लागलेली ही आग दशकातील सर्वात भयंकर आग असल्याचे मानले जात आहे. सुमारे 72 तास हे अग्नीतांडवर सुरू आहे. सुमारे 11,000 विजेचा तडाखा कॅलिफोर्नियाला बसला आहे. ज्यामुळे तब्बल 367 ठिकाणी आग लागली आहे तर, यामुळे 10 हजारहून अधिक झाडं जळून खाक झाली आहे. जंगलातील प्राणीही रस्त्यावर आल्याचे दिसत आहे. कॅलिफोर्नियात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1300हून अधिक अग्निशमन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहेत. विमानांमधून पाण्याचा फवारा केला जात आहे. मध्य कॅलिफोर्नियामध्ये सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस सुमारे 160 मैल (258 कि.मी.) दक्षिणेकडील फ्रेस्नो काउंटीमध्ये हेलिकॉप्टरमधून पाण्याचा फवारा करण्यात येत होते, यावेळी एका विमानाचा अपघात झाला. या अपघातात कॅलिफोर्नियाच्या वनीकरण व अग्निसुरक्षा विभागाच्या एका खाजगी कंत्राटदार पायलटचा मृत्यू झाला. वाचा- भरदिवसा व्यावसायिकाला जिवंत जाळलं; 90 टक्के भाजलं शरीर
उत्तरेकडील, फेअरफिल्ड आणि व्हॅकव्हिली जवळ 46 हजार एकर परिसराला आग लागली. वाऱ्यामुळे ही आग एका रात्रीत पसरली. यात कमीतकमी 50 घरे आणि इतर इमारती जाळून खाक झाल्या आहेत.
वाचा- …आणि हायवेवर लेन सोडून एकमेकांवर आदळल्या 4 गाड्या, भीषण अपघाताचा VIDEO VIRAL या भीषण आगीमुळे कॅलिफोर्नियातील तापमान वाढले आहे. राज्यांतील तापमान तिप्पट झाले आहे. काही दिवसांपूर्वी 100 डिग्री फॅरेनहाइटच्या (सुमारे 37 अंश सेल्सिअस) पलीकडे तापमान होते.
An incredibly ominous view of California this afternoon. Intense wildfires are burning across the state, visible via GOES-17 Satellite imagery. According to @CAL_FIRE, over 20 fires are burning from central to NorCal. #CAwx pic.twitter.com/hDRFL7tcdF
— Jeff Forgeron (@WeatherJefe) August 19, 2020
वाचा- पावसामुळे रस्ता धजला अन् जमिनीखाली गाडल्या गेल्या 21 गाड्या, पाहा VIDEO याआधी अॅमेझॉनच्या जंगलात अशाच प्रकारची आग लागल्याची घटना घडली ज्यामध्ये एक अब्जाहून अधिक वन्य प्राणी ठार झाले होते. यात बरेच दुर्मिळ वन्य प्राणी नष्ट झाले. अॅमेझॉन जंगल हे जगातील सर्वात मोठे आणि दाट जंगल असल्याचे म्हटले जाते.