कॅलिफोर्निया, 30 एप्रिल : कोरोनाविषाणूनं जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत चालला आहे. मात्र संयम आणि धैर्य सध्याच्या काळात खुप महत्त्वाचे आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम आहे. 10 लाखांच्यावर कोरोनाबाधितांच्या संख्या पोहचली आहे. अशा परिस्थितीत शीख समाज लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. शीख सेंटरनं आतापर्यंत लाखो लोकांसाठी लंगर केले आहे. याआधी 30 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी लंगार तयार केले होते. दरम्यान शीख समुदाय करत असलेल्या या कामाचे कौतुक थेट पोलिसांनी हटके अंदाजात केले. कॅलिफोर्निया येथील एक गुरुद्वाराच्या बाहेर पोलिसांनी हॉर्न वाजवत सर्व शीख समुदयाचे आभार मानले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्वीटर युझर केसी सिंग यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस शीखांचे आभार मानताना दिसत आहेत. याच गुरुद्वारामधून रोज हजारो लोकांच्या अन्नाची सोय केली जाते. वाचा- कोरोना माणसाला मारेल माणुसकीला नाही! शीखांनी 30 हजार लोकांसाठी तयार केलं लंगर
Well done guys. Police drive into a California Gurudwara, sirens blaring, to thank for free food being supplied by Sangat/Sikhs. Can’t verify authenticity but sounds/looks right. pic.twitter.com/G8pamI90Zh
— K. C. Singh (@ambkcsingh) April 27, 2020
वाचा- लॉकडाऊनमध्ये एकट्या राहणाऱ्या आजोबांना पोलिसांचं सरप्राइज; केक पाहून अश्रू अनावर याआधी न्यूयॉर्कमधील शीख सेंटरने घरापासून दूर असलेल्या सर्व लोकांसाठी लंगर तयार केले आहेत. या खाद्यपदार्थांची पाकिटे पॅक करण्यासाठी त्यांनी न्यूयॉर्कच्या महापौरांकडे संपर्क साधला होता. त्यांच्या मार्फत लोकांना मदत करण्याचे आवाहनही केले होती. महापौराच्या संमतीनंतर गेले दोन दिवस लोकांना खाद्यपदार्थांचे पॅकेट दिले जात आहे. युनायटेड शीख या ट्विटर हॅडेलवरून लंगर तयार करतानाचा व्हिडीओ अपलोड केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच शीख बंधूंचे संपूर्ण जगात कौतुक केले जात आहे. वाचा- आता कोरोनासमोर झुकायचं नाही, त्याला झुकवायचं! हा PHOTO पाहून वाढेल तुमचं मनोबल संपादन, संकलन-प्रियांका गावडे