कोरोना माणसाला मारेल माणुसकीला नाही! शीखांनी 30 हजार लोकांसाठी तयार केलं लंगर

कोरोना माणसाला मारेल माणुसकीला नाही! शीखांनी 30 हजार लोकांसाठी तयार केलं लंगर

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना, शीख समुदाय पुन्हा एकदा लोकांच्या मदतीसाठी धावून आला आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 25 मार्च : महाभयंकर कोरोनाने हाहाकार माजला आहे. या विषाणूमुळे लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. लोक घरात असली तरी वैद्यकिय कर्मचाऱ्यांना मात्र दिवस-रात्र रुग्णांसाठी झटावे लागत आहे. डॉक्टर, नर्स सध्या तहान भुक विसरून काम करत आहेत. अशाच कर्मचाऱ्यांना मदत म्हणून शीख समुदयाने तब्बल 30 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी लंगार तयार केले.

न्यूयॉर्कमध्ये तब्बल 25 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं दिवसरात्र डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून 30 हजारहून अधिक खाद्यपदार्थांची पाकिटे येथील शीख समुदयाने तयार केली आहेत.

न्यूयॉर्कमधील शीख सेंटरने घरापासून दूर असलेल्या सर्व लोकांसाठी लंगर तयार केले आहेत. या खाद्यपदार्थांची पाकिटे पॅक करण्यासाठी त्यांनी न्यूयॉर्कच्या महापौरांकडे संपर्क साधला होता. त्यांच्या मार्फत लोकांना मदत करण्याचे आवाहनही केले होती. महापौराच्या संमतीनंतर गेले दोन दिवस लोकांना खाद्यपदार्थांचे पॅकेट दिले जात आहे. युनायटेड शीख या ट्विटर हॅडेलवरून लंगर तयार करतानाचा व्हिडीओ अपलोड केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच शीख बंधूंचे संपूर्ण जगात कौतुक केले जात आहे.

वाचा-90 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवलं, 25 दिवस लढा देऊन परतल्या घरी

वाचा-PM Modi चं भाषण सुरू असताना तरुणानं पकडले कान, पुढे काय झालं पाहा VIDEO

अमेरिकेत आतापर्यंत 55 हजार 233 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यातील 797 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अमेरिकेतही लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं सध्या संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. त्यामुळं सध्या अमेरिकेत लोकांच्या खाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. यासाठी शीख समुदयाने एकत्र येऊन हे पाऊल उचलले आहे.

First published: March 25, 2020, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading