जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नशीब बलवत्तर म्हणून तरुणाने मृत्यूलाही दिला चकवा; काळजाचा ठोका चुकवणारा अपघाताचा LIVE VIDEO

नशीब बलवत्तर म्हणून तरुणाने मृत्यूलाही दिला चकवा; काळजाचा ठोका चुकवणारा अपघाताचा LIVE VIDEO

नशीब बलवत्तर म्हणून तरुणाने मृत्यूलाही दिला चकवा; काळजाचा ठोका चुकवणारा अपघाताचा LIVE VIDEO

बस आणि स्कूटीच्या अपघाताचा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मंगळुरू, 14 जानेवारी : वाहतुकीचे काही नियम असतात. पण बरेच लोक स्टंट दाखवण्यासाठी, हिरोगिरी म्हणून कशीही गाडी चालवतात आणि मृत्यूलाच आमंत्रण देतात. अशाच एका भयंकर अपघाताचा व्हिडीओ (Accident video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात भरधाव दुचाकी चालवताना अपघात झालेल्या तरुणाने मृत्यूलाही चकवा दिला आहे. या तरुणाचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. कर्नाटकच्या मंगळुरूतील (Mangaluru scooter bus accident video) ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बस यू-टर्न घेत होती. त्याचवेळी एक तरुण सुसाट स्कूटर चालवल आला. बस समोर आडवी आलेली असतानाही कसलीच पर्वा करता तो गाडी चालवत राहिला, त्याने ब्रेक तर मारलाच नाही पण गाडीचा वेगही कमी केला नाही. हे वाचा -  रिअल ‘सिंघम’चा VIDEO; पोलिसाने चोराला फिल्मी स्टाईलने 10 मिनिटांतच पकडलं व्हिडीओ पाहिला तर त्या क्षणी वाटतं की हा तरुण काही आता वाचलाच नसेल. पण यानंतर पुढे जे घडलं ते खरंच शॉकिंग आहे.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता जशी स्कूटर बसच्या अगदी जवळ आली, तसा तरुणाने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. स्कूटर फिश प्रोसेसिंग युनिटला धडकली आणि त्यानंतर एक झाड आणि दुकानाच्या मध्ये असलेल्या अगदी छोट्याशा जागेतून निघून गेली. पण स्कूटरचा वेग जसा होता तसाच होता. ना ती स्कूटर पडली ना, तरुणाला साधं खरचटलं. जसं काहीच झालं नाही असा तो तिथून सुसाट निघून गेला. हे वाचा -  अपघातानंतर ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदोचा पहिला VIDEO; हात जोडून म्हणाला… अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मंगळुरू सिटी ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात