कोलकाता, 09 जानेवारी : पश्चिम बंगालच्या कटवा इथं रविवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर किमान ४० जण यात जखमी झाले. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान, अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पूर्व बर्दवान जिल्ह्यातील कटवा बीरभूम महामार्गावर हा अपघात झाला. अनियंत्रित झालेली बस रस्त्यावरच उलटली. धक्कादायक बाब म्हणजे काही प्रवासी बसच्या टपावर बसले होते. बस उलटताच काही जण थेट जमिनीवर पडले आणि काहीजण एसटी बसखाली सापडले. अपघातात जखमी झालेल्यांना कटवा उपविभागिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील तीन लोकांची प्रकृती गंभीर आहे.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये बस वेगाने येत असताना दिसते आणि अचानक रस्त्याकडेला उलटते. बसमध्ये प्रवासी संख्या मर्यादेपेक्षा जास्त होती. अपघातावेळी काहीजण बसच्या टपावर बसले होते. बस उलटताच काही जण खाली पडले तर काहींनी उड्या मारल्या. यातील काहीजण बसखाली चिरडले गेले.
हेही वाचा : शारीरिक संबंध ठेवताना वृद्धाचा मृत्यू; मोलकरणीमुळे उलगडलं मृत्यूचं गुढ
बसमधील एका प्रवाशाने सांगितले की, बस वेगात होती आणि आम्हाला काही समजायच्या आधीच ती उलटली. मी कसाबसा बाहेर निघण्यात यशस्वी झालो. आत अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला जात आहे. बस दुर्घटनेच्या कारणाबाबत असं सांगण्यात येतंय की, पुढच्या चाकाखाली शॉकर सस्पेन्शन गिअरमुळे हा अपघात झाला. सस्पेन्शन गिअर जास्ती वजन आणि वेगामुळे अचानक बिघडला. त्यानंतर बस अनियंत्रित झाली आणि रस्त्याशेजारी उलटली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, St bus, St bus accident