जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शारीरिक संबंध ठेवताना वृद्धाचा मृत्यू; मोलकरणीमुळे उलगडलं मृत्यूचं गुढ

शारीरिक संबंध ठेवताना वृद्धाचा मृत्यू; मोलकरणीमुळे उलगडलं मृत्यूचं गुढ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आता तुमच्या मनात आलंच असेल की असं काय घडलं असेल? चला या प्रकरणाला सविस्तर जाणून घेऊ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 09 जानेवारी : बेंगळूरुमध्ये पोलिसांना रस्त्याच्याकडेला एक मृतदेह सापडला. हा एका 67 वर्षीय म्हाताऱ्या व्यक्तीचा होता. ही व्यक्ती कोण आहे आणि तिचा मृत्यू कसा झाला? याचा शोध घेत असतातना. पोलिसांना काही धक्कादायक गोष्टींची माहिती मिळाली. खरंतर या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पोलीस काही गोष्टींचा आढावा घेत या व्यक्तीच्या मोलकरणीपर्यंत पोहोचले. यानंतर या मोलकरणीनं जे सांगितलं, त्यानंतर त्याच्या मृत्यूचं गुढ उलगडलं. आता तुमच्या मनात आलंच असेल की असं काय घडलं असेल? चला या प्रकरणाला सविस्तर जाणून घेऊ. हे ही पाहा : रात्री 8 नंतर बाळ जन्माला येण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही? पाकिस्तानी सरकारचा Video घालतोय धुमाकूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी नगर येथील रहिवासी असलेल्या बालसुब्रमण्यम यांचा मृतदेह 17 नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना आढळून आले की तो माणूस एक दिवस आधी घरातून निघून गेला होता. आपल्या नातवाला बॅडमिंटनच्या वर्गात सोडल्यानंतर, त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना फोन करून सांगितले की तो थोडा उशीरा घरी परतणार आहे. रात्री उशिरापर्यंत ती व्यक्ती घरी परतली नाही आणि त्याचा मोबाईलही बंद होता. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बालसुब्रमण्यम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर जेव्हा पोलिस या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूचा शोध घेत होते, तेव्हा त्यांना त्यांच्या मोलकरणीसंदर्भात एक पुरावा मिळाला. त्यानंतर मोलकरणीसोबत त्याचे शारीरिक संबंध असल्याचे तपासात समोर आले. मोलकरणीला विचारले असता, तिने सांगितले की सेक्स करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. ज्यानंतर तिने तिचा भाऊ आणि नवऱ्याच्या मदतीने या वृद्धव्यक्तीला घराबाहेर आणले आणि त्याला अज्ञात स्थळी सोडून देलं. मोलकरणीने सांगितले की, त्या तिघांनी मृतदेहावर चादर आणि प्लास्टिकच्या आवरणाने झाकून मृतदेहाला कुठेतरी नेवून सोडले. पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपींनी पकडले जाण्याच्या भीतीने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. सार्वजनिक लाजेमुळे मोलकरणीने वृद्धाचा मृतदेह टाकला आपल्या नातवाला बॅडमिंटन क्लासमध्ये सोडल्यानंतर वृद्ध व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता, जी त्याची घरकाम करणारी होती, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांना तपासात असे आढळून आले की, मोलकरणीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना वृद्धाच्या छातीत दुखू लागले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

News18लोकमत
News18लोकमत

गेल्या वर्षीच या वृद्ध व्यक्तीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरण उघडकीस येईल आणि पकडले जाईल या भीतीने मोलकरणीने पती आणि भावासह वृद्धाचा मृतदेह चादर आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळून गोणीत भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात