मराठी बातम्या /बातम्या /Viral /Bungee Jumping करताना अचानक दोरी तुटली आणि... पुढे जे घडलं ते पाहा VIDEO

Bungee Jumping करताना अचानक दोरी तुटली आणि... पुढे जे घडलं ते पाहा VIDEO

श्वास रोखायला लावणारा VIDEO, Bungee Jumping चा आनंद घेणाऱ्या पर्यटकाची दोरी तुटली आणि....

श्वास रोखायला लावणारा VIDEO, Bungee Jumping चा आनंद घेणाऱ्या पर्यटकाची दोरी तुटली आणि....

श्वास रोखायला लावणारा VIDEO, Bungee Jumping चा आनंद घेणाऱ्या पर्यटकाची दोरी तुटली आणि....

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली : Bungee Jumping चा आनंद घ्यायला अनेक पर्यटकांना आवडतो. थोडं धोकादायक असलं तर त्यातली मजा हवी असते त्यामुळे असे थरारक अनुभव पर्यटक घेत असतात. मात्र अशा थरारक अनुभवावेळी काहीवेळा अपघातही होतात. त्याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आले आहेत. आता असाच एक बंजी जंपिंग करताना अपघात झाला. ज्यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं की काय असं वाटलं. काळजात धस्स करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बंजी जंपिंग करताना सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केलं जात असलं तरी, तरीही कधीकधी भयानक अपघात घडतात. थायलंडमध्येही अशीच जीवघेणी घटना घडली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

थायलंडमधील एका मनोरंजन उद्यानात बंजी जंपिंग करताना हाँगकाँगच्या भयंकर अपघात झाला.  बंजी जंपिंग करताना अचानक दोरी तुटली आणि तरुण खाली कोसळला. तिथे खाली घाण पाणी होतं. त्या पाण्यात तो पडला. त्याला दुखापत झाली आहे.

दुखापत झालेल्या तरुणाचं नाव माइक असल्याची माहिती मिळाली आहे. माइक आपल्या मित्रांसोबत थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत हा भयंकर प्रकार घडल्याचं त्याने स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितलं.

नो डाएट, नो व्यायाम; तरी जोडप्यानं कमी केलं 133 किलो वजन, नेमकं काय केलं?

" isDesktop="true" id="855134" >

द सनच्या वृत्तानुसार, हाँगकाँगचा माइक फेब्रुवारीमध्ये त्याच्या मित्रासोबत थायलंडला गेला होता. दोघांनी बंजी जंपिंग करायचं ठरवलं. मात्र यादरम्यान माइक अपघाताचा बळी ठरला. व्हिडीओमध्ये माइक साधारण 10 मजल्यांच्या उंचीवर बांधलेल्या प्लॅटफॉर्मवर हात पसरून उभा असल्याचे दिसत आहे. तो बंजी जंपिंग करताना दोरी तुटली आणि अपघात झाला. या भीषण अपघातातून तरुण थोडक्यात बचावला आहे.

बापरे! काकांनी डान्स करताना थेट स्वतःच्याच खांद्यावर ठेवला पाय; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'खतरनाक'

माइक असं या तरुणाचं नाव आहे. त्याने लोकल मीडियाशी बोलताना सांगितलं की, आम्ही पर्यटनासाठी गेलो होतो, तेव्हा बंजी जंपिंग केलं. त्या दरम्यान झालेल्या अपघातात तिथल्या लोकांची चुकी होती.

या अपघातात छातीला दुखापत झाली, दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावलं. पाण्यात पडल्यामुळे माझे गुडघे सुजले आणि डाव्या डोळ्यालाही लागलं. सुदैवानं सर्जरी करण्याची वेळ आली नाही.

थायलंड टुरिझमकडून या अपघातानंतर कोणतीही मदत मिळाली नाही असा आरोपही त्याने केला आहे. घाण पाणी त्याच्या तोंडात गेल्याने त्यांच्या घशाला इनफेक्शन झालं होतं. त्यामुळे मोठा खर्च देखील झाला. बंजी जंपिंगदरम्यान तिथल्या लोकांच्या चुकीचे परिणाम माइकला भोगावे लागले असा आरोप त्याने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking video viral, Video viral, Viral news, Viral post